घरक्रीडानाशिकचे शरीरसौष्ठवपटू भारतीय संघात

नाशिकचे शरीरसौष्ठवपटू भारतीय संघात

Subscribe

डायमंड कप स्पर्धा

आगामी ‘डायमंड कप’ शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी नाशिकच्या शरीरसौष्ठवपटूंची भारतीय संघात निवड झाली आहे. आशिया व भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस डॉ. संजय मोरे यांच्या पुढाकाराने, इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अ‍ॅण्ड फिटनेसच्या मान्यतेने, तसेच इंडियन बॉडीबिल्डिंग अ‍ॅण्ड फिटनेस फेडरेशन आयोजित ‘डायमंड कप इंडिया’ ही आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव व फिटनेस स्पर्धा यंदा १६ आणि १७ नोव्हेंबरला औरंगाबाद येथे होणार आहे.

या स्पर्धेत मागील ‘डायमंड कप’ स्पर्धेतील रौप्यपदक विजेती स्नेहा कोकणे-पाटील पुन्हा एकदा भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. भारत श्री स्पर्धेतील रौप्यपदक विजेता हबीब शेख आणि झहीर अहमद हे पुरुष शरीरसौष्ठव प्रकारात सहभागी होतील. त्यांच्यासह नितीन बागूल, भावेश शेवाळे, विकास देवरे, समाधान मिसाळ यांचीही या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी साईबाबा हार्ट हॉस्पिटलचे डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, सरचिटणीस राजेंद्र सातपूरकर यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -