घरक्रीडामुंबईचा विजयी चौकार

मुंबईचा विजयी चौकार

Subscribe

सय्यद मुश्ताक अली करंडक

कर्णधार सूर्यकुमार यादवने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडकाच्या सामन्यात पुडुचेरी संघाचा २७ धावांनी पराभव केला. ड गटात असणार्‍या मुंबईचा हा या स्पर्धेतील सलग चौथा विजय होता. त्यामुळे १६ गुणांसह मुंबईचा संघ या गटात अव्वल स्थानावर आहे.

या सामन्यात पुडुचेरीने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. सलामीवीर जय बिस्ता आणि आदित्य तरे यांनी मुंबईच्या डावाची चांगली सुरुवात केली. या दोघांनी ५ षटकांतच ४८ धावा केल्या. मात्र, बिस्ताला २९ धावांवर विनय कुमारने माघारी पाठवत ही जोडी फोडली. पुढच्याच षटकात तरे २० धावा करून बाद झाला.

- Advertisement -

श्रेयस अय्यरला या सामन्यात आपला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. त्याला १९ धावांवर सागर त्रिदेवीने बाद केले. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि सिद्धेश लाड यांनी आक्रमक फलंदाजी करत ६५ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने ३७ चेंडूत ५७ धावा, तर लाडने २२ चेंडूत ३९ धावा केल्या. त्यामुळे मुंबईने निर्धारित २० षटकांत ६ बाद १७१ अशी धावसंख्या उभारली. पुडुचेरीच्या सागर त्रिवेदीने ४ गडी बाद केले.

१७२ धावांचा पाठलाग करताना पुडुचेरीला २० षटकांत ७ बाद १४४ धावाच करता आल्या. त्यांच्याकडून पारस डोग्रा (४५), सुब्रमण्यम आनंद (३९) आणि अरुण कार्तिक (२७) या तिघांनाच चांगली फलंदाजी करता आली. मुंबईच्या शम्स मुलानी आणि तुषार देशपांडेने २-२ विकेट्स मिळवल्या.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक – मुंबई : २० षटकांत ६ बाद १७१ (सूर्यकुमार ५७, लाड ३९; त्रिवेदी ४/२९) विजयी वि. पुडुचेरी : २० षटकांत ७ बाद १४४ (डोग्रा ४५, आनंद ३९; मुलानी २/२५, देशपांडे २/२९).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -