घरमुंबईमहापालिका शाळा फायरप्रुफ, ५ हजार ५८७ अग्निशमन यंत्रे बसवली

महापालिका शाळा फायरप्रुफ, ५ हजार ५८७ अग्निशमन यंत्रे बसवली

Subscribe

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील अग्निसुरक्षेकरता आतापर्यंत एकूण ५ हजार ५८७ अग्निशमन यंत्रे बसवण्यात आली आहेत.

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील अग्निसुरक्षेकरता आतापर्यंत एकूण ५ हजार ५८७ अग्निशमन यंत्रे बसवण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. महापालिकेच्या शालेय इमारतींमधील प्राथमिकसह माध्यमिक शाळांमध्ये अग्निशमन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही ड्राय केमिकल पावडरची आणि सीओटू प्रकारची अग्निशमन यंत्रे बसवण्यात आली आहेत.

आपत्कालिन व्यवस्थापनेचे प्रशिक्षण

मुंबई महापालिकेच्या शाळा, अनुदानित शाळा, विनाअनुदानित शाळांमध्ये कुठलीही अनुचित दुर्घटना घडल्यास त्यावर योग्यप्रकारे नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन यंत्रणा तसेच व्यवस्था यांचे फायर ऑडीट करण्यात यावे आणि शाळेतील कर्मचाऱ्यांना आपत्कालिन व्यवस्थापनेचे प्रशिक्षण देण्यात अशी मागणी नगरसेवकांनी केली होती. शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या मागणीनुसार सभागृहात संमत केलेल्या ठरावावर प्रशासनाच्यावतीने उत्तर देताना ही माहिती देण्यात आली आहे. मुंबई अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या शाळांसह अनुदानित खासगी शाळांची अग्निसुरक्षा आणि अग्निप्रतिबंधक उपाययोजनांची तपासणी केली. शाळांची अग्निसुरक्षेच्या दृष्टीकोनातून तपासणी करून अग्निसुरक्षा आणि अग्निप्रतिबंधक उपाययोजना सुचवण्यात आल्या. त्यानुसार परिपत्रक जारी केले आहे.

- Advertisement -

शाळेतील मुख्याध्यापकसह शिक्षक यांना अग्निशमन यंत्रणा हाताळण्याचे प्रशिक्षण अग्निशमन दल आपत्कालिन व्यवस्थापन खात्याकडून देण्यात आले आहे. सन २०१४-१५ मध्ये महापालिकेच्या शाळांमध्ये ३ हजार ५८७ अग्निशमन यंत्रे तसेच २०१५-१६ मध्ये नवीन २ हजार अग्निशमन यंत्रणा शाळांमध्ये बसवण्यात आली आहे. सन २०१७-१८ मध्ये ७२ नवीन अग्निशमन यंत्राची खरेदी करण्यात आली आहे. सन २०१८-१९ या वर्षात तांत्रिक व विद्युत विभागाकडून अग्निशमन यंत्राचे दुरुस्तीसह पुनर्भरणा आणि नवीन अग्निशमन यंत्र खरेदी करता निविदा प्रक्रीया पूर्ण झाली असून पुनर्भरणा करण्याचे आदेश सर्व प्रशासकीय शाळा यांना देण्यात आलेले आहेत. तसेच शारीरिक शिक्षण विभागातील ५२ शिक्षक आणि कनिष्ठ पर्यवेक्षक यांना प्रत्यक्ष मॉकड्रिल आणि प्रात्यक्षिकाद्वारे शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षित शिक्षकांद्वारे प्रत्येक विभागातील महापालिका शाळेतील मुख्याध्यापकांसह शिक्षकांना देखील प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच शारीरिक शिक्षण विभागाच्या मदतीने महापालिकासह खासगी शाळांमधील शिक्षकांचे आपत्कालिन व्यवस्थापन प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती शालेय विभागाने दिली आहे.


हेही वाचा – भाजपची मेगाभरती झाली, आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मेरिटवर भरती!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -