घरमुंबईरक्त साठवणीत नायर हॉस्पिटल बेस्ट!

रक्त साठवणीत नायर हॉस्पिटल बेस्ट!

Subscribe

शहरातील रुग्णांना रक्तपुरवठा करण्यात सरकारी हॉस्पिटलमधील रक्तपेढ्यांची नेहमीच महत्वाची भूमिका असते. या रक्तपेढ्यांमधील रक्तसाठ्याचे वितरण रुग्णांच्या गरजेनुसार होत असते. महत्त्वाच्या हॉस्पिटलमधील रक्तपेढ्यांची कामगिरी पाहता रक्तसाठ्यांच्या क्रमवारीत महापालिकेचे बा.य.ल. नायर हॉस्पिटलमधील रक्तपेढीचा प्रथम क्रमांक लागतो. ११ नोव्हेंबर रोजी ई- रक्तकोष पोर्टलवर रक्तगटांच्या उपलब्धतेची पाहणी करण्यात आली. यातून ही माहिती समोर आली आहे. यात नायर हॉस्पिटल रक्तपेढीत सात रक्तगटांची ९७ युनिट उपलब्धता असल्याचे दिसून आले. यात बी पॉझिटिव्ह २६, ए पॉझिटिव्ह १७, ओ पॉझिटिव्ह ३७, एबी पॉझिटिव्ह १, ए निगेटिव्ह ८, एबी पॉझिटिव्ह ६, बी निगेटिव्ह २ असे मिळून ९७ युनिट रक्ताची उपलब्धता ई-रक्त कोष वेबपोर्टलवर उपलब्ध असल्याचे दिसून आले. तर, त्यापाठोपाठ केईएम हॉस्पिटलचा क्रमांक येत असून त्यानंतर जेजे, सायन, भाभा आदी हॉस्पिटलच्या रक्तपेढ्यांचा समावेश आहे. पण, याच दिवशी जीटी म्हणजेच गोकुळदास तेजपाल या सरकारी हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा असल्याचे दिसून आले आहे.

मुंबईत २ लाख २० हजार युनिट रक्ताची आवश्यकता!

मुंबईत दोन लाख २० हजार एवढे युनिट रक्त प्रती वर्षी संकलित होणे अपेक्षित आहे. पण, मुंबईमध्ये राज्यातील इतर भागातून तसेच अन्य राज्यातून येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता आणि त्यांना लागणाऱ्या रक्ताची गरज लक्षात घेता स्वैच्छिक रक्तदानाचे प्रमाण ९६.४४ टक्के आहे.

पालिका हॉस्पिटलचे कर्मचारी मुंबई बाहेर जाऊनही अनेकदा रक्तदान शिबिरे घेत असतात. रक्त पुरवठ्याचा विशिष्ट साठा संकलित करून ठेवता येईल, यासाठी नायर हॉस्पिटल प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे रक्तदान करणाऱ्या सामाजिक संस्थांशी आपण सतत जोडलेलो आहोत. यातून इतर हॉस्पिटल्सनाही प्रोत्साहीत करण्यात येत आहे.

डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, नायर हॉस्पिटल

- Advertisement -

हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या रक्तसाठ्याची सद्यस्थिती

केईएम – ३१
जे जे – २७
राजावाडी – ५
सायन – ६
सेंट जॉर्ज – ४
भाभा – २

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -