घरफिचर्सभारताचा विकास आणि आशावाद

भारताचा विकास आणि आशावाद

Subscribe

येत्या 10 वर्षांमध्ये वेगाने आर्थिक विकास करण्याची भारताची क्षमता आहे, असे आशादायी उद्गार बिल गेट्स यांनी काढले. ‘देश प्रगतीपथावर आहे’, असे नेहमीच आपण ऐकत असतो; पण हा विकास खरेच सर्व पातळ्यांवर, सर्व स्तरांवर साधला जात आहे का?, हेही पाहायला हवे. आर्थिक विकासाचे नाणे नेहमीच खणखणत असते, पण देशातील दारिद्य्ररेषेखालील लोकांची दिवसागणिक वाढणारी आकडेवारी आपल्याला अंतर्मुख करते. आरोग्याच्या अनुषंगाने विविध योजना-सुविधा नागरिकांना पुरवल्या जातात खर्‍या. मात्र, कुपोषण आणि भूकबळी या मोठ्या समस्याही अनेक ठिकाणी वारंवार डोके वर काढत असतात. तेथे या योजना पोहचतात की नाही? हे आजपर्यंत न उलगडलेले कोडेच आहे. त्यामुळे ‘भारताचा आरोग्यदायी विकास होत आहे’, असे म्हणणे चुकीचे आणि लाजीरवाणे ठरेल. विविध यंत्रांनी आज मनुष्याचे जीवन जणू यंत्रवतच केलेले आहे. त्यामुळे मनुष्य त्यांच्या पाशात गुरफटत जात आहे. याचा परिणाम म्हणजे भाव-भावनांना एकप्रकारे शून्य मूल्य उरले आहे. याला विकास म्हणावा का? भारत आता लवकरच चंद्रावरही पाऊल ठेवेल आणि संपूर्ण विश्वात आपल्या शिरपेचात मानाचा तुराही रोवून घेईल; परंतु या विकासाच्या गगनभरारीकडे पाहताना देशातील तळागाळातील लोकांच्या समस्या, अडचणी याकडेही तितक्याच गांभीर्याने पाहायला हवे. अन्यथा हा विकास केवळ एकांगी आणि पोकळ ठरेल.

आर्थिक विकास ही संकल्पना स्थूल देशांतर्गत उत्पादन, स्थूल राष्ट्रीय उत्पादन, दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन, दरडोई निव्वळ देशांतर्गत उत्पादन आणि दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पादन यांसारख्या संख्यात्मक पद्धतीने अर्थव्यवस्थेच्या वाढीची स्थिती दर्शवितात. थोडक्यात याचा अर्थ शाश्वत पद्धतीने स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये होणारी वाढ हा आर्थिक विकास किंवा वृद्धी या प्रक्रियेचा महत्त्वाचा पैलू मानला जातो. त्याचबरोबर सामाजिक प्रगतीचा निर्देशांक या आर्थिक विकासामध्ये गणला जातो. आर्थिक विकास ही प्रक्रिया अर्थव्यवस्थेतील भौतिक व कल्याणकारी विकासामध्ये होणारी सुधारणा स्पष्ट करते. ज्यामध्ये गरिबीचे निर्मूलन, साक्षरतेमध्ये होणारी वाढ, बेरोजगारीचे उच्चाटन आणि आर्थिक विषमता कमी करून आर्थिक समानता यांसारख्या गोष्टीमध्ये उत्तरोतर होणार्‍या प्रगतीचा आलेख दर्शविते. आर्थिक विकास या प्रक्रियेची व्याप्ती आर्थिक वृद्धीपेक्षा मोठी आहे. आर्थिक विकास हा उत्पादनामध्ये होणारी वाढ यासह उत्पादन रचनेमध्ये होणारे बदल व उत्पादनक्षमतेच्या आणि उपलब्ध साधनसंपत्तीचे योग्य विभाजनाची माहिती देते व सामाजिक न्याय तत्त्वाची सुनिश्चितता दर्शविते.

आर्थिक विकासाबाबत बर्‍याच बातम्या येत असतात. राजकारणी टिकाटिपण्णी करत असतात. मात्र, नेमका आर्थिक विकास म्हणजे काय हे समजण्यासाठी मुद्दाम या शब्दाचा सखोल अर्थ सांगितला. त्याला कारणही तसेच आहे. आणि मागील आठवड्यात जगातील एकेकाळी सर्वात श्रीमंत म्हणून ओळखले जाणारे मायक्रोसॉफ्ट आस्थापनाचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी ‘येत्या 10 वर्षांमध्ये वेगाने आर्थिक विकास करण्याची भारताची क्षमता आहे. या विकासामुळे गरिबी दूर होईल, तसेच सरकार आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकेल’ असे त्यांनी आश्वासक उद्गार काढले होते. त्यांच्या या महत्त्वपूर्ण विधानाचा अर्थ समजण्यासाठी आर्थिक विकास म्हणजे काय हे समजणे यामुळे सोपे जाईल.

- Advertisement -

‘बिल अ‍ॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन’च्या कामाच्या पाहणीसाठी ते नुकतेच भारतात आले होते. बिल गेट्स यांनी भारतातील आर्थिक, औषधनिर्मिती क्षेत्र, तसेच आधारकार्ड योजना, लस उत्पादन यांचेही पुष्कळ कौतुक केले. ‘आधारकार्ड योजना अन्य देशांनीही कार्यान्वित करायला हवी’, असेही त्यांनी या वेळी सांगितले. भारतातील एका योजनेतून अन्य देशांनी धडा घेण्याचे गेट्स यांचे विधान जागतिक स्तरावरील भारताची प्रतिमा निश्चितच उंचावणारे आहे. गेट्स यांनी अनेक देशांमधील गरिबी कमी करण्यासाठी, तसेच सामाजिक विकासाच्या कार्यक्रमांसाठी बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनला 35 बिलियन अमेरिकन डॉलरपेक्षा अधिक संपत्ती दान केली आहे. त्यामुळे जगातील श्रीमंत असलेल्या व्यक्तीने काढलेले उद्गार भारतासाठी आशादायक आहेत. भारताच्या विकासाचे महत्त्व आणि विकासाच्या अनुषंगाने गेट्स यांची लाभलेली दूरदृष्टी याचा देश पातळीवर सखोल विचार करायला हवा. तसे झाल्यास विकासाची पावले जलदगतीने पडण्यासाठी भारताचे वैश्विक स्तरावरील योगदान पुष्कळ मोलाचे ठरेल.

भारतात येत्या काळात अनेक संशोधक, तंत्रज्ञ आणि वैज्ञानिक यांची मोठी फळी तयार होण्याच्या मार्गावर आहे. यातून भारतीय अर्थव्यवस्थेला निश्चितच सुगीचे दिवस येतील, असे म्हणता येईल. विविध क्षेत्रांतील विकास म्हणजे मानवी समृद्धतेकडे होणारी वाटचालच आहे. विकासाचे सर्वसंमत फायदे लक्षात घेता विकासाचे युग म्हणजे जणू ज्ञानाचा लाभलेला विशाल महासागरच आहे.

- Advertisement -

बिल गेट्स यांनी सांगितल्याप्रमाणे भारताची तंत्रज्ञान क्षेत्रातील वाटचाल जितकी महत्त्वपूर्ण आहे, तितकेच विकासाच्या क्षेत्रातील अडथळ्यांकडेही आपण दुर्लक्षून चालणार नाही. विकास जरी चढत्या क्रमाने असला, तरी तंत्रज्ञानाचा वापर करताना सखोल अभ्यास करणे, मर्यादा ठेवणे, संयम, नियंत्रण बाळगणे हेही तितकेच आवश्यक आहे. संत ज्ञानेश्वरांनीही म्हटले आहे की, समुद्रामध्ये जरी सर्व नद्या येऊन विलीन होत असल्या, तरी तो आवश्यकतेपेक्षा अधिक फुगत नाही किंवा स्वतःची मर्यादाही ओलांडत नाही. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण जणू आकाशालाच गवसणी घालत असतो; पण आकाशावर अधिराज्य न गाजवता केवळ आणि केवळ आपण त्याचे विश्वस्त आहोत, ही भावना बाळगणे आवश्यक आहे. हा विचार कायम स्मरणात ठेवायला हवा, अन्यथा विकासाचा फुगवटा कधी निर्माण होईल, हे लक्षातच येणार नाही. आधुनिक तंत्रज्ञान मर्यादेतच उत्तम आहे, अन्यथा ‘अती तेथे माती’ होते.

‘देश प्रगतीपथावर आहे’, असे नेहमीच आपण ऐकत असतो; पण हा विकास खरेच सर्व पातळ्यांवर, सर्व स्तरांवर साधला जात आहे का?, हेही पाहायला हवे. आर्थिक विकासाचे नाणे नेहमीच खणखणत असते, पण देशातील दारिद्य्ररेषेखालील लोकांची दिवसागणिक वाढणारी आकडेवारी आपल्याला अंतर्मुख करते. आरोग्याच्या अनुषंगाने विविध योजना-सुविधा नागरिकांना पुरवल्या जातात खर्‍या. मात्र, कुपोषण आणि भूकबळी या मोठ्या समस्याही अनेक ठिकाणी वारंवार डोके वर काढत असतात. तेथे या योजना पोहचतात की नाही? हे आजपर्यंत न उलगडलेले कोडेच आहे. त्यामुळे ‘भारताचा आरोग्यदायी विकास होत आहे’, असे म्हणणे चुकीचे आणि लाजीरवाणे ठरेल. विविध यंत्रांनी आज मनुष्याचे जीवन जणू यंत्रवतच केलेले आहे. त्यामुळे मनुष्य त्यांच्या पाशात गुरफटत जात आहे.

याचा परिणाम म्हणजे भाव-भावनांना एकप्रकारे शून्य मूल्य उरले आहे. याला विकास म्हणावा का? भारत आता लवकरच चंद्रावरही पाऊल ठेवेल आणि संपूर्ण विश्वात आपल्या शिरपेचात मानाचा तुराही रोवून घेईल; परंतु या विकासाच्या गगनभरारीकडे पाहताना देशातील तळागाळातील लोकांच्या समस्या, अडचणी याकडेही तितक्याच गांभीर्याने पाहायला हवे. अन्यथा हा विकास केवळ एकांगी आणि पोकळ ठरेल. या सगळ्याच्या जोडीला विकासात खर्‍या अर्थाने अडथळा ठरणारी आर्थिक मंदी, बेरोजगारी, तसेच भ्रष्टाचाराची समस्या सोडवण्यासाठीही तातडीने पावले उचलायला हवीत. या समस्या म्हणजे सध्या देशाच्या विकासाला लागलेले गालबोटच आहे. ते लवकर दूर करायला हवे. सरकार आणि प्रशासन यांनी विकासाच्या अनुषंगाने सखोल विचारविनिमय करायला हवा, कारण प्रत्येक नागरिकाला मुळापासूनचा विकास अभिप्रेत आहे. तो साधणे हे सरकार आणि प्रशासन यांचे कर्तव्य आहे.

अनेकदा अल्पसंख्याकांवर विविध सवलतींचा वर्षाव केला जातो आणि बहुसंख्य मात्र त्यापासून वंचित राहतो. हा अन्याय नव्हे का? एकीकडे विकासाचा उच्चांक गाठायचा आणि दुसरीकडे धार्मिकतेची दरी निर्माण करायची. हा विकासातील मोठा अडथळा आहे. आध्यात्मिक परंपरा लाभलेल्या भारतासाठी हे खेदजनक आहे. बिल गेट्स यांनी भारताच्या विकासाविषयी केलेली उल्लेखनीय आणि आश्वासक विधाने सत्यात उतरण्यासाठी भारताचा विकास सार्वभौम झाला पाहिजे.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -