घरमहाराष्ट्रमाथेरानमधील विद्यार्थ्यांच्या शाळेची पायवाट खडतर!

माथेरानमधील विद्यार्थ्यांच्या शाळेची पायवाट खडतर!

Subscribe

नगर परिषदेचे दुर्लक्ष

 शहरातील सेंट झेव्हिअर हायस्कूलकडे जाणार्‍या मार्गाची गेल्या काही महिन्यांपासून कमालीची दुरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांना या वाटेवरून चालणे नकोसे झाले आहे.

गिरिस्थान असलेल्या या शाळेत दोन माध्यमिक, तर एक नगर परिषदेची शाळा आहे. त्यापैकी सेंट झेव्हिअर हायस्कूल शहरापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आहे. या शाळेत शहर आणि परिसरातील २५० ते ३०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शहरात वाहनांना परवानगी नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पायी जाण्याशिवाय अन्य पर्याय नाही. रस्त्याची अवस्था बिकट असल्याने सायकलही चालविणे मुश्कील आहे. शाळेकडे जाणारा रस्ता व्यवस्थित असण्याची गरज असताना नगर परिषदेने त्याकडे कानाडोळा केल्याचे सर्वांचेच एकमत आहे. या रस्त्यावर भरपूर प्रमाणात दगड, गोटे वर आले असल्याने पावसाळ्यानंतर रस्तावर मातीचा भराव करून सदर रस्ता सुस्थितीत करण्यासाठी नियमित कामे वेळेत न करता दुर्लक्ष केल्याने संपूर्ण रस्त्याची दुरवस्था झालेली आहे.

- Advertisement -

दररोज ये-जा करण्यासाठी विद्यार्थी आणि पालक या रस्त्याचा वापर करतात. या मार्गावर शाळेच्या वेळेत भरपूर प्रमाणात वर्दळ असते. मात्र पहिलाच तीव्र उताराचा रस्ता आणि वर आलेल्या मोठ्या दगडांमुळे दुखापतीसारख्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सदर रस्ता लवकरात लवकर सुस्थितीत करावा, अशी मागणी पालक आणि शिक्षक करीत आहेत.

रहिवासी भागात नगर परिषदेने अंतर्गत रस्त्यांची कामे करताना काही ठिकाणी चांगले प्लेव्हर ब्लॉक काढून त्या ठिकाणी आवश्यकता नसताना नवीन प्लेव्हर ब्लॉक बसविले आहेत. मात्र या दुरवस्था झालेल्या शाळेच्या रस्त्याकडे लक्ष देण्यासाठी नगर परिषदेला वेळ नाही.
-अदित्य भिल्लारे, पालक

- Advertisement -

रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने त्यावरून चालणे कठीण झाले आहे. शाळा सुटण्याच्या वेळेत काही अल्लड विद्यार्थी धावत जातात, परंतु रस्त्याच्या अशा स्थितीमुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने नगर परिषदेने रस्त्याकडे तातडीने लक्ष द्यावे.
-अभिनव कळंबे, शिक्षक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -