घरमनोरंजन'तान्हाजी' चित्रपटानंतर राज ठाकरेंनी केलं 'पानिपत'चं कौतूक!

‘तान्हाजी’ चित्रपटानंतर राज ठाकरेंनी केलं ‘पानिपत’चं कौतूक!

Subscribe

बहुप्रतिक्षीत सिनेमा ‘पानिपत’ येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट प्रत्येकाने बघावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. राज ठाकरे यांनी प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाचं तोंडभरून कौतूक केलं आहे. प्रत्येक मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानीयांनीदेखील पहायला हवा. असं राज यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

 

पानिपतची लढाई ही मऱ्हाटेशाहीनी हरलेली लढाई म्हणून न पाहता तो राजकीय आणि सांकृतिक आक्रमकांना थोपवणाऱ्या मराठ्यांचा शौऱ्याचा अविष्कार होता. नगटात प्रचंड बळ असेलली अन् अटेकपार झेंडा नेणारी मऱ्हाठेशाही कुठे आणि का कमी पडली? हे पाहण्यासाठी पानिपतच्या लढाईकडे पहावंच लागेल. त्यासाठीचा उपलब्ध होत असलेला ध्वनिचित्र दस्तावेज म्हणजे माझे मित्र आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानिपत’ चित्रपट. प्रत्येक मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानीयांनीदेखील पहायला हवा.’ अशाप्रकारचं ट्वीट राज ठाकरे यांनी केलं आहे.

- Advertisement -

हे. यापूर्वी ‘पानिपत’ सिनेमाचे ट्रेलर पाहूनही राज यांनी या सिनेमाचे कौतुक केले होते. पानिपत प्रमाणे तान्हाजी चित्रपटाचे देखील राज ठाकरे यांनी कौतूक केले होते. तान्हाजी द अनसंग वॉरियर हा हिंदी भाषेतील चित्रपट डब करून मराठी भाषेत अजय देवगण चित्रपट प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहे. शक्यतो हिंदी भाषेतील चित्रपट डब करण्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध असतो. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेत असणारा सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा शूर पराक्रम, वीरता अनेकांपर्यंत पोहोचवा यासाठी मनसेने या चित्रपटाच्या हिंदीतून मराठीत डबिंग करण्याला पाठिंबा दर्शवला आहे. याच खास कारणांसाठी मनसे आणि मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांचे आभार मानले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -