घरदेश-विदेशचार नराधमांच्या एनकाऊंटर नंतर आयपीएस सज्जनार यांची चर्चा

चार नराधमांच्या एनकाऊंटर नंतर आयपीएस सज्जनार यांची चर्चा

Subscribe

हैदराबाद येथे डॉक्टर युवती दिशा (नाव बदललेले) वर चार नराधमांनी सामुहिक बलात्कार करुन तिची जाळून हत्या केली होती. या घटनेमुळे संबंध देशभर एक संतापाची लाट पसरली होती. निर्भया, दिशा अशा अनेक लेकींना न्याय कधी मिळणार? असा एकच प्रश्न सगळीकडून विचारला जात होता आणि अचानक आज पहाटे हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर झाल्याची बातमी आली. या एन्काऊंटर नंतर हैदराबादमधील सायबराबादचे पोलीश कमिनशनर व्ही.सी. सज्जनार यांचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. आयपीएस अधिकारी व्ही.सी. सज्जनार यांच्या नेतृत्वाखाली हे एन्काऊंटर झाले असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

२७ नोव्हेंबरच्या रात्री चार नराधमांनी दिशाला एकटे गाठून तिच्यावर सामुहिक बलात्कार करत तिचा जिवंत जाळले होते. त्यानंतर पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले होते. गुन्हा कसा घढला याचा तपास करण्यासाठी आज रात्री त्यांना गुन्हा घडलेल्या ठिकाणी नेण्यात आले होते. मात्र चारही आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी गोळीबार करत चारही आरोपींचा खात्मा केला. या एन्काऊंटर नतंर सायबराबादच्या पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या एन्काऊंटरच्या पाठी व्ही.सी. सज्जनार सारखा खमक्या आयपीएस अधिकारी असल्याची बातमी व्हायरल होत आहे.

कोण आहेत व्ही.सी. सज्जनार

व्ही.सी. सज्जनार हे १९९६ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. २००८ मध्ये देखील त्यांनी एक एन्काऊंटर केले होते. तेलंगाना येथील वारंगलमध्ये एका महाविद्यालयीन युवतीवर अॅसिड हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणातील ३ आरोपींचा एन्काऊंटर करण्यात आला होता. तेव्हा देखील व्ही.सी. सज्जनार यांचे नाव चर्चेत आले होते. एन्काऊंटर मॅन म्हणून ते तेलंगणामध्ये ओळखळे जातात.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -