घरमनोरंजनरणवीर सिंगला व्हायचंय बाबा;मुलांसोबत घालवायचा आहे वेळ!

रणवीर सिंगला व्हायचंय बाबा;मुलांसोबत घालवायचा आहे वेळ!

Subscribe

अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच लग्न झाल्यानंतरही प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. रणवीर तर दीपिकावर आजही खुल्लम खुल्ला प्रेम करतो. सध्या रणवीर सिंगच एक स्टेटमेंट तुफान व्हायरल होत आहे. यात रणवीर आपल्याला बाबा होण्याची इच्छा असल्याचं सांगत आहे. काही दिवसांपूर्वी दीपिका प्रेगन्ट असल्याच्या चर्चेलाही उधाण आलं होतं. आता स्वत: रणवीरनेच ही इच्छा एका कार्यक्रमात बोलून दाखवल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे.

- Advertisement -

रणवीर आणि दीपिका हे बॉलिवूडमधील सध्या क्यूट कपल आहे. रणवीर खुलेआम दीपिकाची काळजीही घेताना दिसतो. नुकतीच रणवीरने एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी बोलत असताना त्याने मला बाबा व्हायचय असं सांगितलं. माझी मनापासून बाबा होण्याची इच्छा आहे. मला माझ्या मुलांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायचा आहे. असे रणवीर म्हणाला. तसेच त्यांनी त्याच्या करियर विषयी अनेक गोष्टींचा उलगडा केला.

- Advertisement -

गली बॉयच्या यशानंतर लवकरच रणवीर ८३ या चित्रपटात झळकणार आहे. ८३ साली भारताने वर्ल्ड कप जिंकला होता यावर हा चित्रपट आधारीत आहे. यात तो कपिल देवच्या मुख्य भुमिकेत आहे तर दीपिका रणवीरच्या पत्नीच्या भुमिकेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -