घरलाईफस्टाईलहिवाळ्यात फिरायला जाताय? अशी घ्या काळजी

हिवाळ्यात फिरायला जाताय? अशी घ्या काळजी

Subscribe

हिवाळ्यात फिरायला जाताना अशी घ्या काळजी.

बऱ्याचदा नाताळच्या सुट्ट्या जवळ आल्या की, वेध लागतात ते हिवाळी पिकनिकचे. मग कधी चार दिवसांच्या लहान पिकनिक रंगतात तर कधी १० दिवसांच्या मोठ्या पिकनिकचा बेत ठरतो. हिवाळ्यातील पिकनिक नक्कीच आपल्याला रिफ्रेश करणारी ठरते. पण हिवाळ्यात प्रवास करताना आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. आता नेमकी कोणती आणि कशी काळजी घ्यावी. चला तर मग जाणून घेऊया.

पाय आखडणे

हिवाळ्यात बऱ्याच जणांना सांधेदुखीचा त्रास उद्भवतो. अशा व्यक्तींने हिवाळीत विशेष काळजी घेणे गरजेचे असते. मात्र, जर तुम्ही पिकनिककरता निघाला असाल तर प्रवासादरम्यान बऱ्याचदा पाय आणि शरीराचे सांधे आखडण्याची शक्यता असते. अशावेळी प्रवासात जर स्वत:ची गाडी असेल तर ठराविक वेळाने ती थांबवून खाली उतरा आणि जर रेल्वेने प्रवास करत असाल तर रेल्वेमध्ये एखादी चक्कर जरुर मारा.

- Advertisement -

घसा दुखणे

बऱ्याचदा पिकनिकसाठी बाहेर पडलो का मग तेलकट पदार्थ खाल्ले जातात. त्यासोबत शीतपेय देखील घेतले जाते. त्यामुळे घसा दुखतो आणि खराब होतो. अशावेळी गरम पाण्याचे सेवन करा. अथवा चहा किंवा कॉफीचे सेवन करा. यामुळे आराम मिळतो.

थंडी, ताप येणे

पिकनिकच्या वेळी कधी कोण आजारी पडेल हे काही सांगता येत नाही. अशावेळी पिकनिकला जाताना स्वत:सोबत तापावरच्या काही गोळ्या, सर्दीसाठी उपयुक्त बाम अशावस्तू सोबत ठेवा. कारण एखाद्या नवीन ठिकाणी लगेच डॉक्टर गाठणे शक्य नसते. त्यामुळे अशावेळी औषधांचा उपयोग होतो.

- Advertisement -

उबदार कपडे घेऊन जा

तुम्ही कुठे जात आहात? त्या ठिकाणाच्या तापमानाची माहिती जाणून घ्या. त्यानुसार उबदार कपडेसोबत घेऊन जा. त्यासोबत वयस्कर व्यक्ती आणि लहान मुले असल्यास शालीसारखे कपडे घेऊन जा.

त्वचेच्या संरक्षणासाठी

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते आणि शरीराला खाज सुटते. त्यामुळे अनेकांचे रक्त देखील येते. अशावेळी कोल्डक्रिम, तेल, लीपबाम यांसारख्या त्वचेला मऊ ठेवतील अशा गोष्टी सोबत ठेवा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -