घरमुंबईरक्ताचे आजार असणाऱ्यांना मोफत रक्त देणं बंधनकारक

रक्ताचे आजार असणाऱ्यांना मोफत रक्त देणं बंधनकारक

Subscribe

रक्तपेढ्यांनी जर रक्तासंदर्भातील रुग्णांना मोफत रक्तपुरवठा न केल्यास यापुढे परवाना रद्द होऊ शकतो. कारण, राष्ट्रीय राज्य रक्त संक्रमण आणि राज्य रक्त संक्रमण परिषदेने याबाबतचे आदेश जारी करत परिपत्रक काढलं आहे. शिवाय, रक्तपेढ्यांनी दर्शनी भागात रक्तासंदर्भातील माहिती देणारे फलक सुद्धा लावायचे आदेश देण्यात आले आहेत. डिसेंबर महिन्याच्या १६ तारखेला हे पत्रक सर्व रक्तपेढ्यांना जारी करण्यात आलं आहे.

केंद्र शासनाच्या आदेशानंतरही काही रक्तपेढ्या रूग्णांना मोफत रक्तपुरवठा करत नसल्याचं निदर्शनास आलं होतं. या तक्रारींना गांभीर्याने घेत रूग्णांना मोफत रक्तपुरवठा होत असल्याचा फलक दर्शनी भागात लावणं बंधनकारक असल्याच्या सूचना सरकारने रक्तपेढ्यांना दिल्या आहेत.

- Advertisement -

थॅलेसिमिया, हिमोफेलिया तसंच सिकलसेल या आजारांनी ग्रस्त असलेल्या रूग्णांना वारंवार रक्त संक्रमणाची गरज असते. ही गरज लक्षात घेता केंद्र सरकारने या रूग्णांना मोफत रक्तपुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने सूचना जारी करुन रक्तपेढ्यांना या आजारांसाठी मोफत रक्तपुरवठा करण्यासंदर्भात रक्तपेढीच्या दर्शनी भागात फलक लावण्याचे आदेशंही दिले आहेत.

पत्रात दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक परवानाधारक रक्तपेढ्यांना थॅलेसिमिया, हिमोफेलिया तसंच सिकलसेल अॅनिमिया आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांना रक्ताचा आणि रक्तघटकाचा मोफत पुरवठा करावा. ज्या रक्ताशी निगडीत आजारात रूग्णाला जीवित राहण्यासाठी वारंवार रक्त संक्रमण करावं लागतं त्या रूग्णांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
जर अशा रूग्णांना मोफत रक्तपुरवठा न झाल्यास, त्यासाठी शुल्क आकारल्यास, बदली रक्तदात्याची मागणी केल्यास किंवा रक्तघटक देण्यास टाळाटाळ केल्यास त्या रक्तपेढीचं नाहरकत प्रमाणपत्र आणि परवाना रद्द करण्यात येईल. तसंच, रक्तपेढीत थॅलेसिमिया, हिमोफेलिया तसंच सिकलसेल या रूग्णांना मोफत रक्तपुरवठा होत असल्याचा फलक दर्शनी भागात लावणं बंधनकारक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -