घरमहाराष्ट्रशिवसेना कार्यकर्ता शेजवळच्या हत्याप्रकरणी चौघांना जन्मठेप

शिवसेना कार्यकर्ता शेजवळच्या हत्याप्रकरणी चौघांना जन्मठेप

Subscribe

शिवसेना कार्यकर्ता सुरेंद्र सिद्धार्थ शेजवळ ऊर्फ घार्‍या याच्या हत्येप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी शुक्रवारी (दि. २०) चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा, प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

शिवसेना कार्यकर्ता सुरेंद्र सिद्धार्थ शेजवळ ऊर्फ घार्‍या याच्या हत्येप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी शुक्रवारी (दि. २०) चार आरोपींना जन्मठेपेची शिक्षा, प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना २० जानेवारी २०१७ रोजी त्रिवेणी पार्क, जेलरोड येथे घडली होती. अनिल ऊर्फ बाळा सखाराम डिग्रसकर (२५, रा.संजय गांधीनगर झोपडपट्टी, जेलरोड), रामा किसन चव्हाण (४७, रा.कोनार्कनगर, आडगाव शिवार), राहुल देवराम गोतरणे (२५, रा.हरिकुलनगर, जेलरोड), शेखर प्रकाश आहिरे (२७, रा. श्रमिकनगर, जेलरोड) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

अनिल डिग्रसकर याचा भाऊ सुभाष ऊर्फ पिंटू डिग्रसकर याचा १३ जुलै २००८ रोजी नाशिक रोड बिटके चौकातील रिक्षा स्टॅण्डवर खून झाला होता. या गुन्ह्यात मुख्य आरोपी सुरेंद्र ऊर्फ घारु सिद्धार्थ शेजवळ होता. २०११ मध्ये तो खूनाच्या गुन्ह्यातून निर्दोषमुक्त झाला होता. तेव्हापासून अनिल डिग्रसकर याच्या मनात सुरेंद्र शेजवळबद्दल राग होता.
२२ ऑगस्ट २०१६ रोजी सुरेंद्र शेजवळ याने अनिल डिग्रसकर याला बंदुकीने गोळी झाडून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी उपनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या होत्या. सुरेंद्र शेजवळने दिलेल्या फिर्यादीत रामा किसन चहाण हासुद्धा आरोपी होता. अनिल डिग्रसकर व रामा चव्हाण यांनी पुर्ववैमनस्यातून राहुल गोतरणे व शेखर आहिरे यांच्या मदतीने सुरेंद्र शेजवळचा खून केल्याचे तपासात उघडकीस आले होते.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्रात शांतता राखा; मुख्यमंत्री ठाकरेंचं जनतेला आवाहन

अशी घडली घटना

२० जानेवारी २०१७ रोजी त्रिवेणी पार्क, जेलरोड या ठिकाणी चौघांनी संगनमत करत सुभाष डिग्रसकर याच्या खूनाचा बदला घेण्यासाठी व आपापसातील दुश्मनीतून खूनाचा कट रचला. विक्रम बाळासाहेब पोरजे व सुरेंद्र शेजवळ हे दोघे दुचाकीवरुन पोरजेच्या घराजवळ आले असता चौघजण कारने त्यांच्याजवळ आले. कारची दुचाकीला धडक मारली. या घटनेत पोरजे व शेजवळ खाली पडले. त्यानंतर चौघांनी शेजवळवर कोयत्यांनी सपासप वार करत ठार केले. आरोपींनी शेजवळचा खून केल्याचे परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदार यास अनुसरुन न्यायालयाने चौघांना जन्मठेपेची शिक्षा, प्रत्येकी एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवसांची साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

वर्चस्ववादातून खून

२००७ मध्ये श्रमिकनगर झोपडपट्टीत रामभाऊ किसन चव्हाण याची चलती होती. शेजवळने चव्हाण कुटुंबावर हल्ला चढवून महिलेसह एकास जखमी केले होते. २००८ मध्ये अनिल डिग्रसकर याच्या सुभाष ऊर्फ पिंटू नावाच्या भावाची हत्या झाली. या गुन्ह्यात शेजवळ मुख्य आरोपी होता. वयाने लहान असलेल्या अनिलची शेजवळ हेटाळणी करायचा. शेजवळकडून होणारा अपमान आणि सुभाष ऊर्फ पिंटू डिग्रसकरच्या हत्या प्रकरणात शेजवळ २०१४ मध्ये निर्दोष सुटला. त्यातच शेजवळ निवडणुकीची तयारी करीत असल्याची माहिती चौघांना मिळाली होती. राजकीय पक्षांकडून शेजवळला ताकद मिळाली तर तो जगणे अवघड करुन सोडेल, या भितीतून चौघांनी संगनमताने शेजवळचा खून केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -