घरमुंबईFlashback 2019: २०१९ पालिकेसाठी दुर्घटनांचे वर्ष

Flashback 2019: २०१९ पालिकेसाठी दुर्घटनांचे वर्ष

Subscribe

30 हजार कोटींचे बजेट असलेल्या मुंबई पालिका प्रशासनाला दरवर्षी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. 2019 हे वर्ष देखील पालिकेसाठी दु:खाच्या तर कधी सुखाच्या घटना घडल्या.या वर्षभरातील घटनाक्रमांचा सामान्य मुंबईकरांवर देखील मोठा परिणाम झाला आहे.वर्षभरात झालेल्या अपघातांत प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली असली तरी अपघात टाळण्याचे आणि इतर धोरणे योग्यपणे राबवण्याची जबाबदारी पालिकेची असणार आहे. येत्या 2020 मध्ये दिवसेंदिवस वाढणार्‍या लोकसंख्येला पायाभूत सुविधा आणि त्यांच्या गरजा पुरवणे आणि झालेल्या चुका टाळण्याचे आव्हान पालिकेसमोर असणार आहे.

जोगेश्वरीच्या ट्रॉमा रुग्णालयात ४ जणांची दृष्टी गेली

जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर रुग्णालयात २५ जानेवारीला सात रुग्णांवर मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यासर्वांना संसर्ग झाल्याने त्यांना दृष्टी गमावण्याची वेळ आली होती. परंतु, त्यापैकी ४ रुग्णांची दृष्टी परत आली असून उर्वरित ३ रुग्णांची दृष्टी कायमचीच गेली. या घटनेनंतर रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.बावा यांना पदावनत करण्यात आले होते.चौकशीचा अहवालानंतर आयुक्तांनी कर्मचार्‍यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत प्रभारी सिस्टर विणा क्षिरसागर, स्टाफ नर्स समृध्दी साळुंके, दिप्ती खेडेकर यांना तात्काळ निलंबित करून त्यांची सर्वंकष चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

- Advertisement -

हिमालय पूल अपघातात ६ जणांचा मृत्यू

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालय पादचारी पुलाचा भाग कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३१ जण जखमी झाले आहे. या कोसळलेल्या पुलाच्या बांधकामाबाबत पूल विभागाच्या दोन निवृत्त अधिकार्‍यांसह एकूण पाच जणांवर ठपका ठेवण्यात आला आहे. यामध्ये पुल विभागाचे कार्यकारी अभियंता ए.आर.पाटील व तत्कालिन सहायक अभियंता एस.एफ.काकुळते यांना निलंबित करण्याचे आदेश बजावण्यात आले. तर स्ट्रक्चरल ऑडीट करणार्‍या डी.डी. देसाई असोशिएटेड इंजिनिअरींग कन्सल्टंट अँड अ‍ॅनालिस्ट प्रायव्हेट कंपनीला काळ्या यादीत टाकले होते.

- Advertisement -

मालाड भिंत दुर्घटनेत ३१ जणांचा गेला जीव

मालाड पूर्व येथील राणीसती मार्गावरील मालाड जलाशयाची भिंत मध्यरात्री झोपड्यांवर कोसळून 31 जणांचा मृत्यू झाला होता. तर 70 जण जखमी झाले होते. या मृतांच्या नातेवाईकांना महापालिकेच्यावतीने प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे. मात्र, ही घटना रहिवाशांनी संरक्षक भिंतीमधील असलेले छिद्र बुजवल्यामुळे पाण्याचा निचरा न झाल्यामुळेच पाण्याच्या दाबामुळे ही घटना घडल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने नोंदवला आहे.

केईएममध्ये प्रिन्सचा मृत्यू

केईएम रुग्णालयातील बालरोग विभागात प्रिन्स राजभर या बालकाचा ईसीजी करताना मशीनमध्ये बिघाड होवून लागलेल्या आगीमध्ये हात आणि कानाला गंभीर इजा झाली होती. या जखमी चिमुरड्याचा प्रारंभी हात कापावा लागला. त्यानंतर या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

बेस्टला २१३६कोटींची आर्थिक मदत

बेस्ट उपक्रमाला ६०० कोटी रुपये अनुदान देण्यात आल्या नंतर कर्ज फेडण्यासाठी ११३६ कोटी रुपये आणि त्यानंतर आणखी ४०० कोटी रुपये असे एकूण २१३६ कोटी रुपये आर्थिक मदत म्हणून महापालिकेने दिली.

रुग्णालयात ५० आणि १०० रुपयांमध्ये चाचणी

मुंबई महापालिकेच्या विशेष रुग्णालय तसेच प्रसुतीगृहांसह दवाखान्यामध्येही रक्तांसाहित इतर वैद्यकीय निदान चाचण्या ‘आपली चिकित्सा’ अंतर्गत सवलतीत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत संस्थानची निवड करण्यात आली.त्यानुसार मूलभूत चाचणीसाठी ५० व अतिविशेष चाचणीसाठी १०० रुपये एवढा दर आकारला जा त आहे.

माहुलमधून ३७ घुसखोरांना हाकलले

माहुलमधील प्रकल्पबाधितांच्या वसाहतीमध्ये बोगस कागदपत्रे बनवून घुसखोरी करणार्‍यांविरोधात विशेष मोहिम राबवून सदनिकांमधील बोगस कागदपत्रांच्या आधारे राहणार्‍या ३७ घुसखोरांना बाहेर काढले.

राणीबागेत सांबर,चितळ,काकरचे दर्शन

भायखळ्यातील राणीबागेच्या प्राणिसंग्रहालयाचे नुतनीकरण करून प्राण्यांच्या पिंजरे बनवण्याचे काम हाती घेण्यात आल्यानंतर यातील तीन पिंजर्‍यांचे लोकार्पण करत त्यात राणीबागेतील सांबर, चितळ आणि काकर यांना ठेवत पर्यटकांना त्यांचे घडविले

महापालिकेचे १४ कर्मचारी निलंबित

महापालिकेच्या ‘ए’ विभागातील नेताजी सुभाष मार्ग (मरीन ड्राईव्ह) परिसरात बायोमेट्रिक हजेरी नोंदवून पसार होणार्‍या व कर्तव्यात कसूर करणार्‍या १४ महापालिका कर्मचार्‍यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच या कामगारांशी संबंधित २ पर्यवेक्षक व एका सहाय्यक मुख्य पर्यवेक्षकास ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्यात आली.

निवड आणि नियुक्ती

मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी यशवंत जाधव यांची पुन्हा बिनविरोध निवड करण्यात आली. तर शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी अंजली नाईक, तसेच सुधार समिती अध्यक्षपदासाठी सदा परब व बेस्ट समिती अध्यक्षपदासाठी अनिल पाटणकर यांचीही बिनविरोध निवड झाली. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची बदली राज्याच्या मुख्य सचिवपदी झाल्यानंतर या रिक्तपदी प्रविणसिंह परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यापूर्वी अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आणि संजय शेठी यांची बदली करुन त्यांच्या जागी प्रविण दराडे यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आय.ए.कुंदन यांची सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या रिक्तपदी डॉ. अश्विनी जोशी नियुक्ती करण्यात आली. मात्र अवघ्या सहा महिन्यांतच जोशी यांची महापालिकेतून बदली करण्यात आली.

खड्डे दाखवा बक्षीस मिळवा

मुंबईतील मोठ्या आकाराचे खड्डयांची तक्रार केल्यानंतर २४ तासांमध्ये न बुजवल्यास ५०० रुपयांची बक्षीस योजना महापालिका प्रशासनाने जाहीर केली. एक आठवड्याकरता राबवण्यात आलेल्या योजनेमध्ये या योजनेमध्ये एकूण १६३० खड्डयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी निश्चित केलेल्या वेळेत १४७५ तक्रारींचे निवारण करण्यात आले होते. तर १५५ तक्रारींचे निवारण करण्यात आले नव्हते. त्यामुळे रस्ते विभागाकडून ७५ तक्रारदार नागरिकांनीच प्रत्येकी ५०० रुपयांची बक्षीसाची रक्कम स्वीकारली.

अनधिकृत कारपार्किंगसाठी १० हजाराचा दंड

मुंबईत महापालिकेद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेल्या १४६ पार्किंग ठिकाणांलगतच्या एक किलोमीटरच्या रस्त्यावर आणि महत्वाच्या रस्त्यांना जोडणार्‍या रस्त्यांवर ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्यात आले. ‘नो पार्किंग झोन’च्या ठिकाणी अनधिकृत ‘पार्किंग’ आढळून आल्यास त्यावर १० हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

तर महापालिकेने १ सप्टेंबरपासून रस्त्यांवर उभ्या केल्या जाणार्‍या बससह मोठ्या अवजड वाहनांवर धडक कारवाई करण्याचा निर्णय घेत अशाप्रकारच्या बसेस वर १५ हजार रुपयांचा दंड आकारण्याची अंमलबजावणी करण्यात आली.

किशोरी पेडणेकर महापौर, सुहार वाडकर उपमहापौर

मुंबई महापालिकेच्या महापौरपदी शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर आणि उपमहापौरपदासाठी मालाडमधील शिवसेना नगरसेवक अ‍ॅड. सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड झाली. भाजपने उमेदवारी अर्ज न भरल्याने तसेच विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षाला अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याने या दोधांची बिनविरोध निवड झाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -