घरताज्या घडामोडीआजपासून मनोज नरवणे नवे लष्करप्रमुख

आजपासून मनोज नरवणे नवे लष्करप्रमुख

Subscribe

आज लष्करप्रमुख बिपीन रावत हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर मनोज नरवणे हे आजपासून लष्करप्रमुखपदाची धुरा सांभाळणार आहेत.

मराठमोळे लेफ्ट. जनरल मनोज मुकंद नरवणे हे आज भारतीय सैन्याच्या लष्करप्रमुखपदाचा पदभार सांभाळणार आहेत. २८व्या लष्करप्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज लष्करप्रमुख बिपीन रावत हे सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर मनोज नरवणे हे आजपासून लष्करप्रमुखपदाची धुरा सांभाळणार आहेत.

मनोज नरवणे यांनी आतापर्यंत स्वीकारल्या अनेक जबाबदाऱ्या

महाविद्यालयीन शिक्षणानंतर मनोज नरवणे यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीत प्रशिक्षण घेतले. जून १९८० मध्ये ते ७ शीख लाइट इंन्फ्रट्रीमधून लष्करात दाखल झाले. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी लष्कारात अनेर जबाबदाऱ्या स्वीकारल्या आणि त्या यशस्वीपणे पारही पाडल्या. मनोज नरवणे यांनी आसाम रायफल्सचे महानिरीक्षक, जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्सचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय म्यानमारमध्ये त्यांनी भारताचे डिफेन्स अटॅची म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. लष्कर प्रशिक्षण कमांडच्या प्रमुखपदाची देखील जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे.

- Advertisement -

मनोज नरवणे यांच्याविषयी

मनोज नरवणे हे मुळचे पुण्याचे आहेत. त्यांचे वडील हवाई दलात अधिकारी होते. त्यांच्या आई सुधा नरवणे या प्रसिद्ध लेखिका आणि आकाशवाणी निवेदक होत्या. याशिवाय मनोज नरवणे यांच्या पत्नी वीणा यांनी देखील शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

हेही वाचा – शपथविधी सोहळ्यातील अनुपस्थितीवर खासदार संजय राऊतांचा खुलासा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -