घरक्रीडा'सुदामा - कृष्णा भेट' आणि कैफने जिंकली चाहत्यांची मने!

‘सुदामा – कृष्णा भेट’ आणि कैफने जिंकली चाहत्यांची मने!

Subscribe

भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने रविवारी आपल्या ट्विटरवरील एका पोस्टने चाहत्यांची मने जिंकली. भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक असलेल्या कैफने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोत त्याने स्वतःला सुदामा आणि सचिनला श्रीकृष्ण म्हणून संबोधले. त्यामुळे सोशल मीडियावर कैफचे खूप कौतुक होत आहे. “मैत्री मनाने होते. श्रीमंती-गरिबीने काही फरक पडत नाही. त्यामुळे आजही श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यातील मैत्रीचे उदाहरण दिले जाते”, असे एका चाहत्याने या फोटोबाबत लिहिले.

कैफ आणि सचिन बरीच वर्षे भारतीय संघात एकत्र खेळले होते. ३९ वर्षीय कैफने १३ जुलै २०१८ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात अविस्मरणीय सामनाही २१ जुलै २००२ रोजी झाला होता. २००२ सालच्या नेटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कैफच्या नाबाद ८७ धावांच्या खेळीमुळे भारताने यजमान इंग्लंडचा पराभव केला होता. ३२६ धावांचा पाठलाग करताना भारताची ५ बाद १४६ अशी अवस्था होती. मात्र, युवराज सिंग (६९) आणि कैफने उत्कृष्ट फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. त्याने १३ जुलै २०१८ मध्ये निवृत्ती घेतल्यावर सचिनने ट्विट करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. ‘तू निवृत्त होण्यासाठी अगदी योग्य दिवस निवडला आहेस. तो सामना आम्हाला आजही आठवतो’, असेही सचिनने ट्विटमध्ये लिहिले होते.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच कैफने सचिन तेंडुलकरची भेट घेतली होती. यावेळी सचिनचे कौतुक करताना कैफ स्वतःला रोखू शकला नाही. त्याने थेट सचिनला कृष्णाची उपाधी देऊन टाकली. या भेटीचा फोटो ट्विटरवर टाकत ‘माझी कृष्णासोबतची सुदामासारखी भेट’ असं कॅप्शनही लिहिलं.

- Advertisement -

सचिन आणि कैफने काही काळ एकत्र खेळण्याचा आनंद लुटला होता. जवळपास ७४ वन डे आणि पाच टेस्टमध्ये ते एकत्र खेळले होते. प्रथम दर्जाचा क्रिकेट आणि इतर फॉरमॅटमध्ये त्याने २५ शतक, १२५ अर्धशतक आणि १९ हजार धावा केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -