घरताज्या घडामोडीगोरेगावच्या पत्राचाळीचा विकास म्हाडा करणार; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय!

गोरेगावच्या पत्राचाळीचा विकास म्हाडा करणार; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय!

Subscribe

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोरेगावमधल्या पत्राचाळींच्या पुनर्विकासाचा मुद्दा अखेर निकाली निघाला आहे. या चाळीच्या पुनर्विकासाची जबाबदारी आता म्हाडाला देण्यात आली आहे.

गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकल्प तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज म्हाडाला दिले. यामुळे पत्राचाळीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून, येथील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात याविषयी बैठक झाली. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. पत्राचाळ प्रकल्पासाठी २००८ मध्ये म्हाडा, विकासक आणि रहिवाशी यांच्यात त्रिपक्षीय करार झाला होता. त्यावेळी शासनावर विश्वास ठेवून ६७२ भाडेकरुंनी आपली घरे रिकामी केली होती. त्यामुळे ४७ एकर जमीन मोकळी झाली होती. तथापि एचडीआयएलने इतर विकासकांना यातील काही भूखंड विकले. मात्र, मूळ रहिवाशांची घरे रखडवली.

रहिवाशांच्या लढ्याला अखेर यश!

दरम्यान, भाडेकरुंसाठी बांधायचे इमारतीचे अपूर्ण राहिलेले बांधकाम म्हाडाने पूर्ण करून द्यावे आणि शिल्लक भाडे द्यावे, अशी मागणी घेऊन भाडेकरू गेली दोन तीन वर्षे आंदोलने व पाठपुरावा करीत आहेत. आज अखेर त्याला यश आले आहे. हा भाडेकरूंनी दिलेल्या लढ्याचा मोठा विजय मानला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -