घरताज्या घडामोडीएफडीएचा अहवाल आला, पुण्याच्या येवले चहात रंगाची भेसळ!

एफडीएचा अहवाल आला, पुण्याच्या येवले चहात रंगाची भेसळ!

Subscribe

येवले चहा प्या, पित्ताचा त्रास घालवा, येवले चहासाठी मिनरल वॉटर वापरलं जातं, अश्या जाहिराती करुन येवले अमृततुल्यने कमी वेळातच आपलं बस्तान पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरात बसवलं. पण, हीच जाहीरातबाजी येवले चहाच्या अंगलट आली होती. एफडीएने येवले चहाच्या पुण्यातील कोंढव्यामध्ये असणाऱ्या कंपनीवर छापा टाकला आणि हे उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचे आदेश दिले. पण, आता पुन्हा येवले चहा चर्चेत आला आहे. कारण, पुण्याच्या येवले चहात भेसळ असल्याचं एफडीए म्हणजेच अन्न आणि औषध प्रशासनाने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. येवले अमृततुल्य चहामध्ये रंग टाकत असल्याची माहिती समोर आली आहे.

एफएसएसएआय म्हणजेच फूड सेफ्टी आणि स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या गाईडलाईननुसार, रंगाचा वापर करणे चुकीचे आहे. काही महिन्यांपूर्वी येवले अमृततुल्य कडून चहामध्ये मेलामाईन नावाचा घातक पदार्थ वापरण्यात आला असल्याचं सांगत एफडीएकडून कारवाई करण्यात आली होती. येवले चहाने एफडीए आणि मानद कायद्याचं उल्लंघन केल्याचं निदर्शनास आलं. त्यानुसार, तात्काळ उत्पादन थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. यासोबतच ६ लाखांचा साठा जप्त केला गेला होता. त्यानंतर त्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासासाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर, आता एफडीएने पुण्याच्या येवले चहामध्ये भेसळ असल्याचा अहवाल दिला आहे.

- Advertisement -

मेलामाईन हा घटक वापरण्याच्या प्रकरणावर येवले अमृततुल्यचे संचालक नवनाथ येवले यांनी सोशल मीडियावर भूमिका स्पष्ट केली होती. या व्हिडीओत येवले अमृततुल्य कडून अशा कोणत्याही घटकाचा वापर चहामध्ये केला जात नसल्याचं येवले यांनी स्पष्ट केलं होतं. पण, आता एफडीएने दिलेल्या अहवालानुसार, पुण्याच्या येवले अमृततुल्य चहामध्ये रंग मिसळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई, पुणे आणि अशा बऱ्याच ठिकाणी येवले अमृततुल्य चहाचे बरेच ऑउटलेट्स आहेत. त्यामुळे हा चहा मुंबईतही प्रसिद्ध आहे. चहाला घट्टपणा आणि गडद रंग यावा यासाठी टारट्राझाईन हा घटक वापरला जात असल्याचं एफडीएकडून मंगळवारी स्पष्ट करण्यात आलं आहे. हे एफएसएसएआयच्या नियमांचं उल्लघंन करण्यासारखं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -