घरताज्या घडामोडीएसटीच्या ताफ्यात येणार नव्या कोऱ्या ७०० बस

एसटीच्या ताफ्यात येणार नव्या कोऱ्या ७०० बस

Subscribe

लालपरी अर्थात आपली सर्वांची लाडकी एसटी बस. गेल्या काही वर्षात तोट्यात असलेल्या एसटीचा कायापालट करण्यासाठी महाविकास आघाडीने पुढाकार घेतला असून, आता एसटी महामंडळाच्या ताफ्यात एक-दोन नव्हे तर तब्बल ७०० नव्या कोऱ्या बस येणार आहेत. एसटीच्या सातशे नव्या कोऱ्या बसेस विकत घेण्यासाठी राज्य सरकारने तब्बल ३० कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. दरम्यान मागील वर्षात पाचशे शिवशाही बसेस वगळता नवीन बसेस एसटीच्या ताफ्यात आल्या नव्हत्या. मात्र आता ७०० बसेस नव्याने एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. विशेष बाब म्हणजे तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाचा तोटा कमी करण्यासाठी जुन्याच बसला रंगरूप देऊन त्या बसेस वापरण्यात येत होत्या.

म्हणून नवीन बस घेण्याचा निर्णय

एसटीच्या बसेस म्हटल्या की अनेकजण नाक मुरडतात. जुन्या एसटीच्या बसेस बघून जुन्या एसटीचा प्रवास नको रे बाब अशी प्रतिक्रिया अनेकांची असते. मात्र आता प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी ७०० नवीन बस खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारच्यावतीने निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा मागील वर्षात करण्यात आली. मात्र दरम्यानच्या काळात निवडणूक आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे हा निधी रखडण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी पाठपुरावा केला त्यानंतर राज्य सरकारने सातशे एसटी बसेसच्या खरेदीसाठी ५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. दरम्यान दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारच्यावतीने घोषित करण्यात आलेल्या पन्नास कोटी रुपयांपैकी ३० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निधीचा वापर बस खरेदीपासून एसटी महामंडळाच्या आधुनिकीकरणासाठी तसेच इतर सोयी सुविधांसाठी करण्यात येणार आहे.

- Advertisement -

अशा येणार नव्या कोऱ्या ७०० बसेस

मिळालेल्या माहितीनुसार एसटीच्या दापोडी (पुणे), चिकलठाणा (संभाजीनगर), हिंगणा (नागपूर) येथील मध्यवर्ती कार्यशाळेत बसची बांधणी होणार असून, दिवसाला सरासरी पाच ते सात बसेस याप्रमाणे १०० दिवसात सातशे बसेस बांधण्यात येणार आहेत. या बसेसची बांधणी झाल्यानंतर या बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -