घरक्रीडाधोनीची वनडेतून निवृत्ती...?

धोनीची वनडेतून निवृत्ती…?

Subscribe

भारताने तिसरी एकदिवसीय लढत आणि मालिका इंग्लंडकडून गमावल्यानंतर पॅवेलियनमध्ये जाताना धोनीने अंपायरकडून बॉल घेतल्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण...

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारत पराभूत झाला आहे. तिसरा आणि निर्णायक सामना पराभूत झाल्यामुळे भारताला ही मालिका गमवावी लागली असून या सर्व पराभवाचे खापर भारताच्या बॅटिंगवर फोडले जात आहे विशेषत: भारताची मधली फळी काही खास कामगिरी करू शकली नसल्याने भारताला पराभवाचा सामना करावा लागल्याची चर्चा आहे. अशावेळी मधल्या फळीतील महत्वाचा बॅट्समन महेंद्रसिंग धोनीही काही खास कामगिरी करू शकला नाहीये. त्यातच त्याच्या सामन्यानंतरच्या एका कृतीमुळे तो वनडेतून रिटायरमेंट घेतोकी काय अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. सामना झाल्यानंतर दरवेळी स्टंप नेणाऱ्या धोनीने यावेळी बॉल नेल्याने त्याच्या रिटायरमेंटच्या चर्चेला उधाण आले आहे.


याआधीही धोनीने टेस्ट क्रिकेटमधून अशीच अचानक रिटायरमेंट घेतली होती. ३० डिसेंबर २०१४ ला जेव्हा भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसरी टेस्ट ड्रॉ झाली तेव्हा धोनीने तात्काळ टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली होती. त्यामुळे धोनी वनडेतूनही अशीच अचानक रिटायरमेंट घेईल अशी चर्चा आहे. धोनीने आतापर्यंत ३२१ एकदिवसीय सामन्यात ५१.२५ च्या सरासरीने १००४६ रन केले असून त्यात १० शतकांचा आणि ६७ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या वनडेत आपले १०००० रन पूर्ण करत जगातल्या ११ बॅट्समनच्या या यादीत जागा मिळवली आहे. त्याने २७३ सामन्यात ही कामगिरी केली असून सर्वात जलद गतीने १०००० धावा करणारा तो ५वा बॅट्समन ठरला आहे. याआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरन २५९ , सौरव गांगुलीने २६३, रिकी पॉटिंगने २६६ तर जॅक कॅलिसने २७२ सामन्यात ही कामगिरी केली आहे.

- Advertisement -

क्रिकेटचा विश्वचषक काही महिन्यांवर येऊन ठेपला अाहे. अशावेळी भारताची बॅकबोन असणाऱ्या धोनीने निवृत्ती घेतल्यास भारतीय टीमचे काय होईल अशी भीती धोनी चाहत्यांतून व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -