घरदेश-विदेशगुजरातमध्ये कार अपघातात एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये कार अपघातात एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू

Subscribe

गुजरातमध्ये कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. अपघातामध्ये कार आणि ट्रकने पेट घेतला. कारला लागलेल्या आगीमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गंभीर जखमी झालेल्या एकावर राजकोट सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

गुजरातमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. राजकोट – मोरबी हायवेवर मंगळवारी रात्री भीषण अपघात झाला. मोरबी जिल्ह्यातील टंकारा येथे इको कार आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही गाड्यांना आग लागली. इको कारमधून प्रवास करणाऱ्या ८ जणांचा जागीच जळून मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

अपघातानंतर दोन्ही गाड्यांनी घेतला पेट

मंगळवारी रात्री ९ वाजता इको कारमधून ८ जण कच्छच्या रापरवरुन राजकोटला जात होते. दरम्यान मोरबी जिल्ह्यातील टंकारा येथे या कारने ट्रकला धडक दिली. अपघातानंतर दोन्ही गाड्यांनी पेट घेतला. या अपघातामध्ये सहा जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर जखमी झालेल्यांना राजकोट सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दोन जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर एकावर उपचार सुरु आहेत. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सहा पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.

- Advertisement -

एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू

राजकोटमध्ये राहणारे ५ जण आणि त्यांचे ग्वालियर वरुन आलेले ३ नातेवाईक इको गाडीने प्रवास करत होते. टंकाराजवळील साई शक्ती हॉटेलजवळ कार पोहचल्यानंतर ती थेट ट्रकला जाऊन धडकली. अपघातानंतर इको गाडीला आग लागली. गाडीच्या ड्राईव्हरला आणि त्यामध्ये बसलेल्यांना बाहेर येता आले नाही. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये कारमधील सागर भाई, बलवंत भाई, त्यांचे वडील रमेश भाई, आई मीना बेन, भावना बेन आणि राकेश भाई या ८ जणांचा मृत्यू झाला. अपघातानंतर एका तासाने फायरब्रिगेडचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवली. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -