घरट्रेंडिंगVideo: पोलवरून १५ फूट खाली पडली तरी डान्स करू लागली!

Video: पोलवरून १५ फूट खाली पडली तरी डान्स करू लागली!

Subscribe

अमेरिकेच्या टेक्सासमधील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरून समोर आला आहे. कॅफेमध्ये एक डान्सर आपल्या नृत्याचे कौशल्य दाखवण्यासाठी ती चक्क १५ फूट उंच पोलवर चटली. मात्र दुर्देवाने की पोलवरून खाली पडली तरी देखील ती डान्स करत राहिली. या घटनेत तिला हनुवटीला दुखापत झाली. त्यानंतर तिला लगेच रुग्णालयात नेण्यात आले आणि तिच्या हनुवटीला टाके घातले.

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये जीनिया नावाची डान्सर एक्सटीसी कॅफेमध्ये पोलवर चढली आणि लटकून आपले कौशल्य दाखवत होती. त्यानंतर ती जेव्हा खाली उतरत होती तेव्हा ती खाली पडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून १० कोटी पेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.

- Advertisement -

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जीनियाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये तिने नेटकऱ्यांना आपल्या अवस्थेबद्दल आणि घटनेबद्दल सांगितलं आहे. तसंच हा व्हिडिओ शेअर करताना तिने असं लिहिलं की, ‘मला या घटनेमुळे खूप मेसेज येत आहेत. तसंच माझ्या प्रकृतीची विचारपूस केली जात आहे. मी आता ठीक आहे. ही माझ्यासाठी खूप भयानक वेळ होती. मला फक्त चेहऱ्यावर जखम झाली आहे.’ या घटनेच्यानंतर ट्विटवर नेटकऱ्यांनी तिने पोलवरून पडून देखील डान्स केल्यामुळे कौतुक केले आहे.


हेही वाचा – करोना अपडेट – राज्यात करोनाचा आता दोनच संशयित रुग्ण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -