कळवा स्थानकाबाहेर कचऱ्याला लावलेल्या आगीमुळे या परिसरात धुराचे लोट उसळत आहेत. या धुराचा परिणाम दोन्ही मार्गांवरील स्लो ट्रॅकवर झालेला आहे. रुळांच्या खाली असणाऱ्या केबलनेही या आगीमुळे पेट घेतला आहे. त्यामुळे आग अजून वाढली आहे.
मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या लोकल उशिराने आहेत. ठाणे आणि कळवा स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
- Advertisement -
कळवा रेल्वे रुळालगत कचरा पेटवल्यामुळे आग लागली असून सर्वत्र परिसरात धूर पसरला आहे. आणि याच्या परिणामातून लोकल खोळंबल्या आहेत.