घरताज्या घडामोडीVideo: नितीन नांदगावकर बॅक इन अॅक्शन; माटुंगा ब्रिजवरील विकृत तरुणाला चोप

Video: नितीन नांदगावकर बॅक इन अॅक्शन; माटुंगा ब्रिजवरील विकृत तरुणाला चोप

Subscribe

काही दिवसांपूर्वी माटुंगा रोड रेल्वे ब्रिजवर छेडछाड करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ उघडकीस आला होता. त्यानंतर या तरुणाला अटक करण्यात आलं होती. मात्र त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर आता या तरुणाला शिवसेनेचे नेते नितीन नांदगावकर यांनी चांगलाचं चोप दिला आहे. याचा व्हिडिओ नितीन नांदगावकर यांच्या फेसबुक पेज शेअर केला असून सध्या तो व्हायरल होत आहे. मूळचा उत्तर प्रदेशातील असलेल्या या विकृत तरुणाचं नाव रजिउर खान आहे. तो ३७ वर्षांचा आहे. सध्या तो वडाळा येथे राहत असून त्याचा २६ जानेवारीचा माटुंगा रोड रेल्वे ब्रिजवरील तरुणीच्या गालावरती मागून जाऊन किस करताना व्हिडिओ समोर आला होता.

चुकीला माफी नाही …..PART 1महाराष्ट्रातील माझ्या माता -भगिनींना समर्पित …..जिथे जिथे मुलींवर अत्याचार होतील आणि ते नराधम वासनेने पछाडलेले मोकाट फिरत असतील तिथे तिथे जाऊन त्यांना ठोकणार …..हात-पाय शाबूत राहणार नाहीत हा माझा शब्द ……मग तो कोणत्याही जाती-धर्मचा असुदेत त्याची धिंड काढली जाईल …हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून महाराष्ट्रातील तमाम माता -भगिनींच्या संरक्षणाची जवाबदारी घेतो ……रयतेच्या राज्यात माता -भगिनींना ह्यापुढे कोणीच वेड्या वाकड्या नजरेने बघू नये !!५ दिवस रोज माटुंगा ब्रिज वर येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना कुठेही हात लावून पसार होणारा विकृत त्याची हिम्मत होते कशी ?१५ दिवसा पासून वाट पाहत होतो …गेले कित्येक दिवस त्याला शोधण्यात गेले कारण त्याचा घरचा पत्ता खोटा …या विकृताची जवाबदारी कोण घेणार …?म्हणून अशा विकृतीचे जागेवर हात छाटले गेले पाहिजेत बस ……मला पर्वा नाही माझे काय होईल याची पण अशा समाजकंटकांना नागडा करणार !!शिवसैनिकTo be continue ……..

Nitin Nandgaonkar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 17, 2020

- Advertisement -

‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक म्हणून महाराष्ट्रातील तमाम माता-भगिनींच्या संरक्षणाची जबाबदारी घेतो. रयतेच्या राज्यात माता-भगिनींना ह्यापुढे कोणीच वेड्या वाकड्या नजरेने बघू नये. ५ दिवस रोज माटुंगा ब्रिज वर येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना कुठेही हात लावून पसार होणारा विकृत त्याची हिम्मत होते कशी? १५ दिवसा पासून वाट पाहत होतो. गेले कित्येक दिवस त्याला शोधण्यात गेले कारण त्याचा घरचा पत्ता खोटा होता. या विकृताची जबाबदारी कोण घेणार? म्हणून अशा विकृतीचे जागेवर हात छाटले गेले पाहिजेत बस. मला पर्वा नाही माझे काय होईल याची पण अशा समाजकंटकांना नागडा करणार’, असं त्यांनी व्हिडिओ शेअर करताना लिहिलं आहे.

नक्की काय घडलं होत?

मुंबई माटुंगा रोड रेल्वे पुलावरती या विकृत तरुणाने एका तरुणीच्या गालावरती तिच्या मागून जाऊन किस करतानाचा व्हिडिओ समोर आला होता. यापूर्वी देखील तरुणाने एकट्या असणाऱ्या महिलांशी आणि तरुणींशी अशाप्रकारे विनयभंग केल्याचे समोर आलं होत.

- Advertisement -

मुंबईत तरूणीचा विनयभंग, तरूणानं रेल्वेपुलावर केलं किस

मुंबईत तरूणीचा विनयभंग, तरूणानं रेल्वेपुलावर केलं किस

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಫೆಬ್ರವರಿ 5, 2020


हेही वाचा – संगीत शिक्षक विनयभंग करायचा; पीडिते मुलीनं मोठी झाल्यावर केलं हे धाडस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -