घरट्रेंडिंगशरद पवार ठरवणार मुंबईचा सीपी

शरद पवार ठरवणार मुंबईचा सीपी

Subscribe

सीपी संजय बर्वे यांना मुंबई पोलिसांकडून मानवंदना

मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्या सेवा निवृत्तीच्या निमित्ताने मुंबई पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. मुंबईतील दादरच्या नायगाव येथील पोलिस मैदानात त्यांना गार्ड ऑफ ऑनर मानवंदना देण्यात आली आहे. मुंबई सीपींच्या सन्मानार्थच ही गार्ड ऑफ ऑनर हा आदर व्यक्त करण्यात आला.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा आणि निवडणुका झाल्यानंतर लगेच दुसऱ्यांदा अशी मुदतवाढ संजय बर्वे यांना मिळाली होती. पण नवीन मुंबई पोलिस आयुक्तांची घोषणा मात्र अद्यापही झालेली नाही. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे नवे पोलीस आयुक्त कोण असणार, हे तुम्हाला लवकरच कळेल’, अशी स्पष्टोक्ती दिली आहे. त्यामुळे नव्या पोलिस आयुक्त पदावर कोण येणार याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांशी चर्चा करूनच मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मुंबईच्या नव्या सीपीची घोषणा करतील असे अपेक्षित आहे. नव्या सीपीसाठी शरद पवार यांचा सल्लाही घेण्यात येणार आहे असे बोलले जात आहे.

- Advertisement -

सॅल्युट सीपी

१९८७च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले संजय बर्वे यांनी याआधी राज्याच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून देखील कामकाज पाहिले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याकडून बर्वेंनी पदभार स्वीकारला होता. मागील वर्षी नोव्हेंबर २०१९मध्ये संजय बर्वे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. त्यााधी विधानसभा निवडणुकांच्या आधी देखील त्यांना अशाच प्रकारे तीन महिन्यांची मुदतवाढ सेवेत देण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -