घरक्रीडा'मुंबई श्री' शरीरसौष्ठव स्पर्धेत अडीचशे स्पर्धक सहभागी

‘मुंबई श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेत अडीचशे स्पर्धक सहभागी

Subscribe

स्पर्धा यंदा अंधेरीच्या सेलिब्रेशन स्पोर्टस् क्लबमध्ये होत आहे.

‘मुंबई श्री’ स्पर्धा मुंबईतील शरीरसौष्ठवपटूंसाठी सर्वात महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे शरीरसौष्ठवपटू दरवर्षी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि यंदाही हेच चित्र पाहायला मिळाले आहे. ९ गटांमध्ये होत असलेल्या पुरूषांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेतील मुख्य गटात १५४, तर फिटनेस फिजीक स्पोर्ट्स गटात १०० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे. त्यामुळे यंदाही ‘स्पार्टन मुंबई श्री’ स्पर्धा चुरशीची होणार हे निश्चित झाले आहे.

बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटनेने आयोजित केलेली ही स्पर्धा यंदा अंधेरीच्या सेलिब्रेशन स्पोर्टस् क्लबमध्ये होत आहे. शुक्रवारी या स्पर्धेची प्राथमिक फेरी झाली असून शनिवारी होणारी या स्पर्धेची अंतिम फेरी ५१ शरीरसौष्ठवपटूंमध्ये रंगेल. ‘स्पार्टन मुंबई श्री’ स्पर्धेचा विजेता भास्कर कांबळे, सुशील मुरकर, निलेश दगडे, दिपक तांबीटकर, उमेश गुप्ता किंवा रसेल दिब्रिटो यांच्यापैकी एक होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

- Advertisement -

शुक्रवारी झालेल्या प्राथमिक फेरीत प्रत्येक गटातून अव्वल सहा खेळाडूंची निवड करण्यात आली. ५५ किलो वजनी गटात ओंकार आंबोवकर, अजिंक्य पवार, नितीन शिगवण, राजेश तारवे यांच्यात चुरस पाहायला मिळाली. ६० किलो वजनी गटात अरूण पाटील, प्रितेश गमरे, देवचंद गावडे यांच्यात स्पर्धा आहे. ६५ किलो वजनी गटात उमेश गुप्ताचे वर्चस्व असून तो मुंबई श्री जिंकण्यासाठीही दावेदार आहे. ७० किलो वजनी गटात कोणता शरीरसौष्ठवपटू बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या गटात ३७ शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले असून जजेसना केवळ ६ शरीरसौष्ठवपटू अंतिम फेरीसाठी निवडायचे आहेत. ८० किलो वजनी गटात असलेल्या सुशील मुरकरला मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुंबई श्री जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार मानला जात आहे. मात्र, त्याला सुशांत रांजणकर, अभिषेक खेडेकर, स्वप्निल मांडवकर, गणेश पेडामक यांसारखे शरीरसौष्ठवपटू आव्हान देतील हे निश्चित.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -