घरट्रेंडिंगGoAir च्या अहमदाबाद - जयपूर फ्लाईटमध्ये शिरले कबूतर, व्हिडीओ व्हायरल  

GoAir च्या अहमदाबाद – जयपूर फ्लाईटमध्ये शिरले कबूतर, व्हिडीओ व्हायरल  

Subscribe

GoAir एअरलाईन्सच्या अहमदाबाद - जयपूर फ्लाईटमध्ये कबूतर शिरल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे फ्लाईटच्या उड्डाणाला ३० मिनिटे विलंब झाला. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

‘गो-एअर’ एअरलाईन्स कंपनीचे हे विमान अहमदाबाद विमानतळावरून जयपूरसाठी रवाना होणार होते. मात्र अचानक विमानात कबूतर असल्याचे कळले. हे कबुतर विमानात उडत असल्याचे दिसत आहे. अचानकपणे हे कबूतर विमानात आल्याने प्रवाशी आणि कर्मचारी यांच्यात एकाच गोंधळ उडाला. विमानाचे कर्मचारी कबूतराला पकडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच एक प्रवासी “इसका बोर्डिंग पास चेक करो ” असे म्हणत कर्मचाऱ्यांना टोमणा मारत असल्याचे ऐकु येत आहे, त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. दरम्यान हे कबूतर विमानात आले कुठून याचे कारण अद्यापही कळू शकलेले नाही. मात्र या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पहा व्हिडीओ –

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -