घरटेक-वेकगुगलचं 'डुडल' आपण पाहिलंत का?

गुगलचं ‘डुडल’ आपण पाहिलंत का?

Subscribe

गुगलनं आपल्या नव्या डूडलमध्ये २८, २९ आणि १ अशा तारखा लिहिल्या आहेत.

लोकप्रिय सर्च इंजिन ‘गुगल’ हे प्रत्येक खास दिवशी ‘डुडल’ तयार करुन तो दिवस साजरा करत असते. महापुरुषांची जयंती असो किंवा विज्ञान दिन असो, नवीन वर्ष असो वा जागतिक महिला दिन असो. असे अनेक महत्वाचे आणि खास दिवस साजरा करण्यासाठी गुगल आपल्या हटके डुडलद्वारे त्या दिवसाला खास बनवले जाते. यंदाचं वर्ष हे ‘लीप वर्ष’ आहे. यामुळे गुगलने आज एक खास डूडल तयार केलं आहे. यात गुगलनं आपल्या नव्या डूडलमध्ये २८, २९ आणि १ अशा तारखा लिहिल्या आहेत.

काय असतं लीप वर्ष?

पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सर्वांना माहित आहे. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी ३६५.२४२ दिवस लागतात. परंतु ०.२४२ दिवसांचा कालावधी आपण दरवर्षी पकडत नाही. दर चार वर्षांची याचे मिळून २४ तास होतात. यामुळेच एक दिवस पूर्ण होत असल्यानं फेब्रुवारी महिना २९ दिवसांचा होतो, यालाच लीप वर्ष म्हणतात. ज्या वर्षाला ४ने भाग जातो त्याला लीप वर्ष असं म्हणतात. उदा, २०२० या आकड्यातील २० ला ४ नं भाग जातो. लीप वर्षाव्यतिरिक्त फेब्रुवारी महिन्यात २८ दिवस असतात. येशू ख्रिस्त यांच्या जन्मानंतर चार वर्षांनी पहिल्यांदा लीप वर्ष आलं होतं. त्यानंतर दर चार वर्षांनी लीप वर्ष येतं. आता यापुढील लीप वर्ष २०२४ मध्ये येणार आहे. लीप वर्षात ३६५ ऐवजी ३६६ दिवस असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -