घरक्रीडामहिला टी-२० वर्ल्ड कप: इंग्लंड, द.आफ्रिका उपांत्य फेरीत

महिला टी-२० वर्ल्ड कप: इंग्लंड, द.आफ्रिका उपांत्य फेरीत

Subscribe

इंग्लंडने वेस्ट इंडिजचा ४६ धावांनी, तर दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा १७ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत दिमाखदार प्रवेश केला आहे.

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी महिला टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. याआधी भारतीय संघाने सलग तीन सामने जिंकत विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान, रविवारी झालेल्या सामन्यांत इंग्लंडने वेस्ट इंडिजचा ४६ धावांनी, तर दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा १७ धावांनी पराभव केला.

- Advertisement -

वेस्ट इंडिजविरुद्धच्या साखळी सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ बाद १४३ अशी धावसंख्या उभारली. त्यांच्या नॅटली स्किव्हरने ५७ धावांची खेळी केली. १४४ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव अवघ्या ९७ धावांत आटोपला आणि इंग्लंडने हा सामना जिंकला. इंग्लंडच्या सोफी एक्लेस्टोनने ३, तर सारा ग्लेनने २ विकेट मिळवल्या.

- Advertisement -

दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानविरुद्ध प्रथम फलंदाजीत निर्धारित २० षटकांत ६ बाद १३६ अशी धावसंख्या केली. त्यांच्याकडून मधल्या फळीतील लॉरा वोल्वर्डने ३६ चेंडूत नाबाद ५३ धावा केल्या. याचा पाठलाग करताना पाकिस्तानला २० षटकांत ५ बाद ११९ धावाच करता आल्या.


हेही वाचा – ६ जनरल डबे जोडण्याच्या आदेशाला केराची टोपली


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -