घरमनोरंजनमलायका- अर्जुनच्या डिनर डेटचा विचका, फोटो व्हायरल!

मलायका- अर्जुनच्या डिनर डेटचा विचका, फोटो व्हायरल!

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर आपल्या अफेअरच्या चर्चेमुळे नेहमी बातम्यांमध्ये असते. लवकरच हे दोघं लग्न करणार असल्याची चर्चा आहे. आधी या दोघांनी आपलं नातं लपवून ठेवलं होतं. मात्र आता या दोघांनी उघड- उघड फिरायला सुरूवात केली आहे. या दोघांनी अद्याप नात्याची कबूली दिली नसली तरी त्यांनी कधी अमान्यही केलं नाहीये. सध्या कोणताही कार्यक्रम असो, कौटूंबिक सोहळा असो हे दोघं हातात हात घालून फिरतात.

- Advertisement -

नुकतच या दोघांना एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट करण्यात आलं. हे दोघं डिनर डेटसाठी गेले होते. मात्र रेस्टॉरंटमध्ये जागा नसल्यामुळे त्यांची डिनर डेंट फ्लॉप झाली आहे. शेवटी बराचवेळ वाट बघितल्यानंतर या दोघांनी पर्सल घेत घरी जाणाच पसंत केलं.

- Advertisement -

रविवार असल्यामुळे मलायका आणि अर्जुन दोघेही डिनरच्या मूडमध्ये होते. पण रविवार असल्यामुळे रेस्टॉरंटमध्ये प्रचंड गर्दी होती. एकडी टेबल रिकामे नव्हते. साधारण काही वेळ वाट पाहिल्यानंतर या दोघांनी घरी पार्सल घेऊन जाणच पसंत केलं. सध्या या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोत अर्जुन ब्ल्यू शर्ट आणि कार्गो पॅण्टमध्ये दिसला. तर मलायकाने व्हाईट कटआऊटचा ड्रेस घातला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -