घरताज्या घडामोडीविरोधी पक्षनेतेपाठोपाठ भाजपच्या गटनेतेपदासाठी प्रभाकर शिंदेचेच नाव

विरोधी पक्षनेतेपाठोपाठ भाजपच्या गटनेतेपदासाठी प्रभाकर शिंदेचेच नाव

Subscribe

विरोधी पक्षनेतेपाठोपाठ भाजपच्या गटनेतेपदासाठी प्रभाकर शिंदेचेच नाव जाहीर करत त्याचे पत्र महापौरांना सादर केले आहे.

मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांचे नाव जाहीर करत त्याचे पत्र महापौरांना सादर करणार्‍या भाजपला मंगळवारी उपरती झाली. गटनेत्याचे पत्र न देता थेट विरोधी पक्षनेत्याचे नाव देत एकप्रकारे भाजपने गोंधळ निर्माण केला होता. परंतु, हा गोंधळ आपल्याच अंगाशी येईल आणि गटनेत्याची निवड लांबणीवर पडेल या भीतीने अखेर मंगळवारी भाजपने प्रभाकर शिंदे यांचेच नाव गटनेतेपदासाठी जाहीर करत महापौरांकडे पाठवले आहे. त्यामुळे प्रभाकर शिंदे हे संसदीय नेते तर विनोद मिश्रा हे पक्षाचे नेते म्हणून काम पाहणार आहे. यासाठी येत्या ५ मेच्या सभेमध्ये गटनेतेपदाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

शिंदेंचे नाव चालवून मिश्रांची पक्षनेतेपदी केली बोळवण

भारतीय जनता पक्षाचे महापालिकेत ८३ नगरसेवक असून दोन अपक्षांसह त्यांची संख्या ८५ एवढी आहे. परंतु २७ एप्रिल रोजी झालेल्या पक्षाच्या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर शिंदे यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदी तर विनोद मिश्रा यांची निवड पक्षाच्या गटनेतेपदी करण्यात आली होती. परंतु, महापौरांना सादर केलेल्या पत्रांमध्ये गटनेतेपदासाठी नाव जाहिर करण्यात आलेल्या विनोद मिश्रा यांच्या नावाचे पत्र न देता परस्पर विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव जाहिर झालेल्या प्रभाकर शिंदे यांचे पत्र सादर करण्यात आले होते. परंतु विरोधी पक्षनेता जाहिर करण्यासाठी आधी गटनेतेपदाची निवड करणे बंधनकारक आहे. पण हा नियम डावलून भाजपने विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रभाकर शिंदे यांचेच नाव पुढे केले होते. त्यामुळे सभागृहात विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय गटनेत्याच्या निवडी अभावी जाहीर करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे विरोधी पक्षनेता पद तसेच गटनेतेपदी दोन्हींच्या घोषणेत होणारी अडचण लक्षात घेता अखेर भाजपने मंगळवारी याबाबतचे पत्र महापौर किशोरी पेडणेकर यांना सादर केले.

- Advertisement -

विनोद मिश्रा यांचा गेम

विनोद मिश्रा यांची निवड भाजपच्या गटनेतेपदी केली असल्याने, त्यांचे पत्र प्रथम महापौरांना सादर करणे आवश्यक होते. परंतु विनोद मिश्रा यांची दिशाभूल करण्यासाठी भाजपने प्रभाकर शिंदे यांचे विरोधी पक्षनेत्याचे पत्र महापौरांना सादर केले. परंतु त्याच दिवशी प्रभाकर शिंदे यांचे गटनेतेपदाचे पत्र भाजपने तयार केले होते. परंतु सभागृहाच्या आदल्यादिवशी महापौरांना सादर करत गटनेतेपदाची स्वप्ने पाहणार्‍या विनोद मिश्रा यांचा गेम भाजपने केला. प्रभाकर शिंदे यांची गटनेतेपदासाठी शिफारस करताना भाजपने महापौरांना सादर केलेल्या पत्रात विरोधी पक्षनेतेपदासाठी त्यांचे नाव कायमच ठेवले आहे. त्यामुळे गटनेता आणि विरोधी पक्षनेता या दोन्हींची घोषणा महापौरांनी येत्या ५ मार्चच्या महापालिका सभेत करावी,अशीही विनंती भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या स्वाक्षरीने केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.


हेही वाचा – ३० दिवसात प्रकल्पग्रस्तांच्या सदनिका हस्तांतरीत करा, नाही तर फौजदारी कारवाईला सामोरे जा – जितेंद्र आव्हाड

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -