घरताज्या घडामोडीमध्य प्रदेशचे काँग्रेस सरकार संकटात? ज्योतिरादित्य सिंधियासोबत १६ आमदार बंगळुरूत

मध्य प्रदेशचे काँग्रेस सरकार संकटात? ज्योतिरादित्य सिंधियासोबत १६ आमदार बंगळुरूत

Subscribe

मध्य प्रदेशमधील मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार संकटात सापडले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत १६ आमदार आणि ६ मंत्री बंगळुरुत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे भाजपचेही ६ आमदार बंगळुरुत गेलेले आहेत. यानंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी तातडीची बैठक भोपाल येथे बोलवली आहे.

काही दिवसांनी राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्याआधीच मध्य प्रदेशमधील राजकारणाची सुंदोपसंदी समोर आली आहे. कमलनाथ सरकार हे टोकावरचे बहुमत घेऊन सरकार चालवत आहे. याआधी देखील कमलनाथ यांनी भाजपचे नेते काँग्रेसच्या आमदारांना फोडायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता.

- Advertisement -

सध्या भोपाळ येथे कमलनाथ यांनी आपत्कालीन बैठक बोलवली असून या बैठकीला काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह आणि इतर कॅबिनेट मंत्री देखील उपस्थित आहेत. तसेच कमलनाथ यांना पाठिंबा देणारे अनेक आमदार या बैठकीला पोहोचले आहेत. कमलनाथ यांचे सहकारी सरकारला कोणताही धोका नसल्याचे सांगत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -