गोवंडीतील शिवाजी नगर मधील एक दुदैवी घटना समोर आली आहे. चार वर्षांच्या चिमुरड्याचा शौचालयाच्या टाकीत पडून मृत्यू झाला आहे. आरिफ नसूल्लाह शेख असं या मृत चिमुरड्याचं नाव आहे. शौचलयाच्या टाकीत पडलेल्या या चिमुरड्याला स्थानिक लोकांनी राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र राजावाडी हॉस्पिटलचे डॉक्टर वडवे यांनी त्या मुलाला मृत घोषित केलं. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. आज सायंकाळी ५.१७ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
हा मुलगा एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी चालत होता. मात्र चालत असताना त्याला शौचालयाच्या टाकीवरील लाकडी झाकणाच्या अंदाज आला नाही. त्यामुळे तो लाकडी झाकण्यावरून शौचालयाच्या टाकीत पडला. यामुळे या चिमुकल्याचा दुदैवी मृत्यू झाला आहे.
Maharashtra: A 4-year-old boy died after falling into a septic tank in Govandi area of Mumbai, this evening.
— ANI (@ANI) March 10, 2020
हेही वाचा – धक्कादायक! मोबाईल दिला नाही म्हणून पत्नीची केली हत्या