घरताज्या घडामोडीशिवसेनेनंही निष्ठावंतांना डावललं, प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेची उमेदवारी!

शिवसेनेनंही निष्ठावंतांना डावललं, प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेची उमेदवारी!

Subscribe

शिवसेनेनं त्यांच्या कोट्यातली राज्यसभेची उमेदवारी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांना दिली आहे. त्यामुळे पक्षातील चंद्रकांत खैरे, दिवाकर रावते यांच्यासारखे निष्ठावंत नाराज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकीकडे भाजपनं एकनाथ खडसेंसारख्या पक्षाच्या निष्ठावंतांना राज्यसभेच्या उमेदवारीमध्ये डावलल्यानंतर आता त्यांचा ३० वर्ष मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत पक्षातल्या निष्ठावंतांना डावलून उमेदवारी जाहीर केली आहे. यंदा शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांच्यापैकी एकाला राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा सुरू होती. हे दोन्ही नेते पक्षाचे निष्ठावंत असल्यामुळे त्यांच्यापैकीच एकाला उमेदवारी मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, त्या दोघांना डावलून अवघ्या काही महिन्यांपूर्वी म्हणजे लोकसभा निवडणुकांच्या आधी शिवसेनेत दाखल झालेल्या आणि काँग्रेसच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींना शिवसेनेने आपल्या कोट्यातली राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे, आता शिवसेनेतील निष्ठावंतांमध्ये नाराजी पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा – एकनाथ खडसेंची पुन्हा निराशा; राज्यसभा उमेदवारी दिली भलत्यालाच!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -