घरताज्या घडामोडीअमेरिकेनेच वुहानमध्ये करोना पसरवला- चीनचा गंभीर आरोप

अमेरिकेनेच वुहानमध्ये करोना पसरवला- चीनचा गंभीर आरोप

Subscribe

करोना व्हायरसवरून जगभरात हाहाकार उडाला असतानाच याच मुद्द्यावरून चीन व अमेरिकेत जुंपली आहे. अमेरिकन लष्करानेच वुहानमध्ये करोना व्हायरस पसरवला नंतर तो इतर देशांमध्ये पसरला असा गंभीर आरोप करत चीनने खळबळ उडवली आहे.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी ट्विटरवर ही माहिती दिली आहे. वुहानमध्ये करोनाचा फैलाव करण्यामागे अमेरिकेच्या लष्कराचा हात असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच याप्रकरणी अमेरिेकेने जबाबदारीने वागणे अपेक्षित असल्याचेही लिजियान यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

लिजियान यांनी आपला हा मुद्दा अधिक स्पष्ट करताना युएस सेंटर फॉर डिसिज कंट्रोल (सीडीसी)चे संचालक रॉबर्ट रेडफिल्ड यांना लक्ष्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी रेडफिल्ड यांनी म्हटले होते की काही अमेरिकन इन्फ्लुएन्झा होऊन मृत्यूमुखी पडत आहेत. कदाचित त्यांना चीनमधील करोना व्हायरसची लागण झाली आहे. यामुळे या मृत्यूंसाठी चीन जबाबदार आहे. असा आरोप रेडफिल्ड यांनी केला होता.

तसेच झाओ यांनी याप्रकरणी अमेरिकेवर निशाणा साधला असून आधी अमेरिकेला स्वत:च्या घरात काय चाललयं ते बघायला हवे. अमेरिकेत किती रुग्ण दगावले हे पाहायला हवे. करोना रुग्णांसाठी रुग्णालयात काय विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. हे जगासमोर आणायला हवे. युएस सेंटर फॉर डिसिज कंट्रोलचीच ही चूक असल्याचे जगासमोर आले आहे. यामुळे अमेरिका चीनला जबाबदार ठरवू शकत नाही. सर्वात आधी अमेरिकेने हे जाहीर करावे की त्यांच्याकडे करोनाचा पहीला रुग्ण केव्हा आढळला. त्याची प्रकृती आता कशी आहे. अमेरिकेने त्यांच्या देशातील करोना रुग्णांचा आकडा जगजाहीर करायला हवा याबरोबरच अमेरिका  महत्वपूर्ण माहिती लपवत असल्याचा आरोपही चीनचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी केला आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -