घरताज्या घडामोडीउन्नाव बलात्कार प्रकरण: कुलदीप सेंगरला १० वर्षांचा कारावास

उन्नाव बलात्कार प्रकरण: कुलदीप सेंगरला १० वर्षांचा कारावास

Subscribe

न्यायालयाने कुलदीप सेंगरसह सहा जणांना दोषी ठरवले आहे.

उन्नाव बलात्कार प्रकरणी आरोपी उत्तर प्रदेशातील भाजप आमदार कुलदीप सेंगरला न्यायालयाने दणका दिला आहे. उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी आरोपी कुलदीप सेंगरला न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने कुलदीप सेंगरला पीडितेच्या वडिलांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवध व गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली त्याला दोषी ठरवले. न्यायालयाने त्याला १० वर्षांचा कारावास आणि १० लाखांचा दंड सुनावला आहे.

उन्नाव बलात्कार प्रकरणी कुलदीप सेंगरला गेल्या वर्षी न्यायालयाने दोषी ठरवले होते. उन्नाव पीडितेच्या वडिलांचा एप्रिल २०१८ मध्ये पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. न्यायालयाने या प्रकरणावर बुधवारी सुनावणी केली. न्यायालयाने कुलदीप सेंगरसह सहा जणांना दोषी ठरवले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – CORONA VIRUS: १००वं नाट्य संमेलन पुढे ढकललं


कुलदीप सेंगरने हेतु पुरस्पर पीडितेच्या वडिलांचा खून केलेला नसून तिच्या वडिलांना क्रूरपणे मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला, असे जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा यांनी सांगितले होते. मुलीच्या वडिलांच्या खून प्रकरणात सीबीआयने ५५ साक्षीदार तपासले. त्यानंतर न्यायालयाने पीडितेचे काका, आई, बहीण, वडिलांचे सहकारी यांचा जबाब घेतला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -