घरCORONA UPDATECoronaVirus- 'कॉल करा आणि मदत मिळवा', काँग्रेसचा उपक्रम!

CoronaVirus- ‘कॉल करा आणि मदत मिळवा’, काँग्रेसचा उपक्रम!

Subscribe

राज्यासह देशात सध्या कोरोनाचे संकट असून, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या  १९३ वर पोहोचली आहे. याच कोरोनाच्या संकटामुळे सध्या देशभरात लॉक डाऊन घेण्यात आले असून, या लॉकडाऊनमुळे सगळ्यात जास्त हाल झाले आहेत ते हातावर पोट असणाऱ्यां मजुरांचे. सध्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना सर्वोतोपरी सरकारी पातळीवर मदत करण्यात येत आहे. मात्र आता काँग्रेस  देखील या  लोकांच्या मदतीसाठी धावून आले असून, राज्यातील गरीब, रोजंदारी कामगार यांच्यासह संकटात असलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आपत्कालीन मदत कक्ष आणि हेल्पलाईन सुरु केल्या असून, संपूर्ण राज्यात ही हेल्पलाइन आणि मदत कक्ष सुरू करण्यात आले आहेत.

घरातून फक्त एक कॉल करा –

काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मदत कक्ष आणि हेल्पलाईनवर एक कॉल केल्यास जी हवी ती मदत पुरवली जाणार असून, आपल्याला अन्न, औषधे किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या मदतीची गरज असेल तर आपण घरात थांबून फक्त एक फोन कॉल करा, काँग्रेस कार्यकर्ते आपल्या मदतीला येतील असे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे मदत कक्ष आणि हेल्पलाईन – 

दरम्यान काँग्रेसने संपूर्ण महाराष्ट्रात मदत कक्ष आणि हेल्पलाइन सुरू केले असून, पश्चिम महाराष्ट्र्र, उत्तर महाराष्ट्र्र, मराठवाडा, कोकण, विदर्भ आणि मुंबई या ठिकाणच्या कार्यकर्त्याना याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच प्रदेश समन्वयक म्हणून शालेय शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.


हे ही वाचा- CoronaVirus – खानदेशात आढळला कोरोनाचा पहिला रुग्ण!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -