घरलाईफस्टाईलगर्भवती महिलांना ह्रदयविकाराचा अधिक धोका - रिसर्च

गर्भवती महिलांना ह्रदयविकाराचा अधिक धोका – रिसर्च

Subscribe

अमेरिकेतील करण्यात आलेल्या एका अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे. 'मेयो क्लिनिकल प्रोसिडिंग्ज'नं प्रसिद्ध केलेल्या लेखातून ही बाब समोर आली. आजकाल बऱ्याच महिला या वाढत्या वयात मुलांना जन्म देत असल्याचं मुख्य कारण असल्याचा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे.

गर्भवती असताना अथवा मुलांना जन्म दिल्यानंतर दोन महिन्यादरम्यान महिलांना ह्रदयविकाराचा झटका येण्याचा धोका असल्याचं रिसर्चमधून सिद्ध झालं आहे. अमेरिकेतील करण्यात आलेल्या एका अभ्यासातून ही गोष्ट समोर आली आहे. ‘मेयो क्लिनिकल प्रोसिडिंग्ज’नं प्रसिद्ध केलेल्या लेखातून ही बाब समोर आली. आजकाल बऱ्याच महिला या वाढत्या वयात मुलांना जन्म देत असल्याचं मुख्य कारण असल्याचा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे. तर वाढत्या वयानुसार, ह्रदयविकाराचा झटका गर्भावस्थेत येण्याचा धोका वाढला असल्याचंही यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.

गर्भावस्था महिलांसाठी असते तणावपूर्ण

न्यूयॉर्क विद्यापीठ लांगोन हेल्थच्या शोधाच्या सहलेखक श्रीपाल बेंगलोर यांच्या म्हणण्यानुसार, एका दशकाच्या अभ्यासानुसार, गर्भावस्थेत आईचं शरीर आणि त्यांच्या ह्रदयावर अतिशय तणाव असतो. त्यामुळं शारीरिक बदल होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे ह्रदयविकाराचा झटका येतो. सध्याच्या कामाचा ताण तसंच इतर परिस्थिती आणि वयानुरुप महिलांवर जास्त ताण येत असतो. पूर्वी विशीमध्ये मुलांचा जन्म व्हायचा मात्र आता महिला ३५ ते ३९ या वयातदेखील मुलांना जन्म देतात. जे ह्रदयविकारासाठी जास्त जोखमीचं असतं हे या अभ्यासातून सिद्ध झालं आहे.

- Advertisement -

लठ्ठपणा आणि मधुमेहदेखील मुख्य कारण

दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे महिलांमधील वाढता लठ्ठपणा आणि मधुमेहदेखील आहे. सध्या महिलांमध्ये लठ्ठपणा आणि मधुमेह होण्याचं प्रमाण वाढलं आहे. अभ्यासातून काढलेल्या निष्कर्षानुसार, ४,९८,२९,७५३ इतक्या अर्जांचा अभ्यास केल्यानंतर मुलाला जन्म देत असताना १,०६१ महिलांना ह्रदयविकाराचा झटका आला तर मुलांच्या जन्मापूर्वी साधारण ९२२ महिलांना रुग्णालयात या कारणासाठी भरती करण्यात आलं. तर मुलांना जन्म दिल्यानंतरच्या अवस्थेत साधारण २.३९० महिलांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचं सांगण्यात आलं आहे.

गर्भधारणेपूर्वी शरीराची तपासणी करू घ्यावी

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, गर्भावस्थेनंतर लगेच वा गर्भधारणेच्या पहिलेच महिलांनी आपल्या शरीराची संपूर्ण तपासणी करून घेणं आवश्यक आहे. त्यामुळं सुरुवातीलाच आपल्याला असलेल्या त्रासाची माहिती मिळू शकेल आणि योग्य वेळी त्यावर उपचार करता येतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -