घरCORONA UPDATECoronavirus: 'आता ५ मिनिटांत होणार कोरोनाची रॅपिड टेस्ट'

Coronavirus: ‘आता ५ मिनिटांत होणार कोरोनाची रॅपिड टेस्ट’

Subscribe

कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत जात असताना कोरोना बाधितांची चाचणीचा रिपोर्ट येण्यासाठी याआधी खूप वेळ जात होता. मात्र आता रॅपिड टेस्टिंगसाठी मान्यता मिळाली आहे. या टेस्टिंगच्या माध्यमातून ५ मिनिटाच्या आत कोरोना तपासणीचा रिझल्ट कळू शकणार आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हीडीयो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली. या बैठकीत मोदींनी या रॅपिड टेस्टसाठी मान्यता दिली.

राजेश टोपे म्हणाले की, “ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट या त्रीसूत्रीवर कोरोनाशी लढाई केली जात आहे. ड्रोन, जीपीएस आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून कोरोना बाधित आणि विलगीकरण केलेल्या लोकांना ट्रेस केले जाणार आहे. तसेच टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे अशी मागणी आम्ही केंद्राकडे करत होतो. त्यावर आज मोदींनी रॅपिड टेस्टसाठी मान्यता दिली आहे. या माध्यमातून पाच मिनिटांत प्राथमिक चाचणी करुन कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे का? हे कळू शकणार आहे. अगदी रक्त तपासणी प्रमाणे ही टेस्ट केली जाणार आहे.”

- Advertisement -

तसेच आता प्रत्येक जिल्ह्यात कोविड १९ या विषाणूच्या रुग्णांसाठी विशेष हॉस्पिटल प्रत्येक जिल्हास्तरावर उभारले जाणार आहेत. राज्याने काही जिल्ह्यात असे हॉस्पिटल कार्यरत देखील केले आहेत. जिथे हाय रिस्क झोन आहेत, तिथे कर्फ्यूचे नियम कडक केले जाणार असून सोशल डिस्टसिंगच्या माध्यमातून तडजोड केलील जाणार नसल्याचे टोपे यांनी सांगितले.

राज्यात १४७ हाय रिस्क झोन आहेत. त्याठिकाणी १४४ कलम लावून सोशल डिस्टसिंग कठोरपणे लागू केले जाणार आहे. तसेच राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना दर्जेदार मास्क, हँडग्लोज उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य प्रयत्न करणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले. विविध प्रकारच्या बाजारात मोठी गर्दी होऊ नये याची काळजी राज्य सरकारकडून घेण्यात येईल. हजरत निजामुद्दीन इथं जो मोठा कार्यक्रम झाला त्यात आपल्या राज्यातील १४०० बांधव उपस्थित होते. त्यांचा शोध घेण्याची प्रक्रीया सुरू झाल्याचेही टोपे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -