घरCORONA UPDATECorona: 'माहुल'चे रूपांतर क्वारंटाईनमध्ये; मात्र स्थानिकांनी केला कडाडून विरोध

Corona: ‘माहुल’चे रूपांतर क्वारंटाईनमध्ये; मात्र स्थानिकांनी केला कडाडून विरोध

Subscribe

प्रकल्पग्रस्तांसाठी माहुलमध्ये उभारलेल्या रिकाम्या इमारतींमध्ये संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. मात्र त्याला सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांकडून विरोध करण्यात येत आहे.

मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना संशयितांच्या संख्येतही वाढ होत आहे. संशयितांना क्वारंटाईन करण्यासाठी सरकारकडून मुंबईमध्ये अनेक जागांचा शोध घेण्यात येत आहे. त्यावर आता प्रकल्पग्रस्तांसाठी माहुलमध्ये उभारलेल्या रिकाम्या इमारतींमध्ये संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. मात्र त्याला सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांकडून विरोध करण्यात येत आहे.

५० स्थलांतरित मजुरांना इमारतीत आश्रय 

कोरोनाविरोधात सारा देश लढा देत आहे. कोरोनाग्रस्तांपेक्षा संशयित कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक आहे. संशयितांना १४ दिवस क्वारंटाईन करणे आवश्यक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. परंतु ज्यांना शक्य नाही त्यांना सरकारकडून नियोजन केलेल्या क्वारंटाईन कक्षामध्ये ठेवण्यात येत आहे. परंतु संशयितांची वाढती संख्या लक्षात घेता आता मुंबई महापालिकेकडून माहुल येथे प्रकल्पग्रस्तांची बांधलेल्या इमारतींमध्ये क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येत आहे. माहुल येथे अनेक इमारती रिकाम्या आहेत. त्यामुळे अनेक संशयितांना तेथे हलवण्यात येत आहे. २९ मार्चला तेथे ५० स्थलांतरित मजुरांना ठेवण्यात आले होते. मात्र स्थानिक आणि सामाजिक संघटनेने विरोध केल्यानंतर त्यांना अन्यत्र हलवण्यात आले. त्यानंतर ३ एप्रिलला आणखी काही जणांना तेथे आणण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: भारतीय अभियंत्यांनी बनवले ६० पट स्वस्त व्हेंटिलेटर

माहुल हा परिसर राहण्यायोग्य नाही. तेथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण असल्याचे उच्च न्यायालयात सिद्ध झाले आहे. त्यामुळे माहुलला क्वारंटाईन सेंटर सुरू करणे हे चुकीचे ठरू शकते. कारण कोरोनाच्या रुग्णांना श्वसनाचा सर्वाधिक त्रास असताना त्यांना माहुलसारख्या प्रदूषित भागात ठेवणे हे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे माहुलमध्ये क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येऊ नये, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बिलाल खान यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -