घरCORONA UPDATECoronavirus Breaking: नवी मुंबईचे टेन्शन वाढले; कोरोना पॉझिटिव्हचा आकडा २२ वर

Coronavirus Breaking: नवी मुंबईचे टेन्शन वाढले; कोरोना पॉझिटिव्हचा आकडा २२ वर

Subscribe

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गुरुवारी कोरोनो पॉझिटिव्ह रुग्णांनी तर उच्चांक मांडला. तब्बल नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. नवी मुंबईतील कोरोनो संसर्ग असलेल्या रुग्णांची संख्या आता २२ वर गेली आहे. कोरोनाचा आकडा वाढत असल्याने नवी मुंबईकर भयभीत झाले आहेत. मात्र, घाबरून जाऊन नका, घरी रहा , सुरक्षित रहावे आव्हान नवी मुंबई महानगर पालिका प्रशासनाने केले आहे.. नवी मुंबईत होम कॉरोनटाइन, इंडस्ट्रियल कॉरोनटाइन, वाशी येथील मनपा रुग्णालय अशा विविध ठिकाणी ९८८ जण अलगीकरणात आहेत.

नवी मुंबईतील कोरोनो बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत चालल्याने नवी मुंबई टेन्शन मध्ये आलीय. कोरोनो रोखण्याचे शर्थीचे प्रयत्न नवी मुंबई महापालिका करत आहे. विविध उपाययोजना ,जनजागृती कार्यक्रम करीत आहे. महापालिका क्षेत्रात निर्जंतुकीकरण केले. आरोग्य सर्व्ह सुरू केला.
मात्र, रुग्ण वाढल्याने चिंता वाढली आहे.

- Advertisement -

नवी मुंबईतील खारघर येथे नियुक्त असलेले केंद्रीय सुरक्षा बलाच्या आणखी सहा जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. खारघर येथे १३९ अधिकारी आणि सेवेसाठी १२ जवान तैनात केलेले आहेत. यापैकी ५ जवानांना याआधीच कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता आणखी ६ जवानांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

खारघर येतील केंद्रीय सुरक्षा बलाच्या सर्व अधिकारी, जवानांना दि. २ एप्रिल रोजी रात्री कळंबोली येथील महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये हलवले होते. तिथे स्वतंत्र विलगीकरण कक्षात त्यांना ठेवण्यात आले होते. या सर्व जवानांची तात्काळ कोरोना टेस्ट घेण्यात आली होती. त्यापैकी आज ६ जवानांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -