घरमहाराष्ट्रमुंबई-पुण्यात लॉकडाऊन कायम राहणार?

मुंबई-पुण्यात लॉकडाऊन कायम राहणार?

Subscribe

राज्यासह देशात सध्या करोनामुळे 21 दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला असून, 14 एप्रिलला देशातील लॉकडाऊन संपत आहे. मात्र देशातील लॉकडाऊन जरी 14 एप्रिलला संपत असला तरी देखील मुंबई पुण्यासारख्या शहरात लॉकडाऊन कायम राहण्याची शक्यता आहे.

राज्यात करोनाचा बाधितांचा आकडा 748 पोहोचला असून, मुंबईत सर्वाधिक करोनाचे रुग्ण आढळले आहेत. करोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता, मुंबई-पुणे यांसारख्या शहरी भागातील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या भागात किंवा जिल्ह्यात करोनाबाधित रुग्ण नाही त्या ठिकाणी टाळे बंदी शिथिल करण्याचा सरकारचा विचार आहे.

- Advertisement -

सर्व जिल्ह्याच्या सीमा बंदच राहणार
राज्यासह देशात सध्या करोनामुळे लॉकडाऊन सुरू असून 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन ठेवायचा की आणखी वाढवायचा याबाबत सध्या केंद्र सरकार विचार करत आहे. यासाठी सर्व राज्यातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनद्वारे संवाद साधला आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जरी लॉकडाऊन 14 तारखेला संपले तरी देशातील सर्व जिल्ह्याच्या सीमा मात्र बंदच राहणार आहेत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे देशातील महत्त्वाच्या प्रशासकीय अधिकार्‍यांशी चर्चा केली. आणि त्यानंतर देशांतल्या सर्व प्रशासकीय यंत्रणेला या सूचना देण्यात आल्या आहेत.

म्हणून सीमा बंद
देशात लॉकडाऊन असताना देखील करोना रुग्णांची संख्या मात्र कमी होताना दिसत नाही. त्यामुळे देश तिसर्‍या स्टेजमध्ये जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, प्रत्येक जिल्हा पातळीवर हायड्रोक्लोरोक्वीनच्या दहा हजार गोळ्या आल्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिवांनी आज देशातील महत्त्वाच्या प्रशासकीय अधिकार्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे चर्चा केली. यात लॉकडाऊननंतर देशातल्या सर्व जिल्ह्यांच्या सीमा दोन आठवडे सीलच ठेवण्याचा विचार झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच या संदर्भात सर्व प्रशासकीय यंत्रणेला ह्या सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -