घरCORONA UPDATEपीपीई म्हणजे काय? कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना का महत्वाचे आहे?

पीपीई म्हणजे काय? कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना का महत्वाचे आहे?

Subscribe

संसर्गबाधित रुग्णांवर उपचार करताना पीपीईचा वापर करणं आवश्यक असतं.

देशभरात कोरोना विषाणूच्या वाढत्या घटना लक्षात घेता केंद्र सरकारने पीपीई-पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट किट आणि मेडिकल इक्विपमेंट किटचे उत्पादन देशांतर्गत वाढवलं आहे. या वैद्यकीय उपकरणांमध्ये व्हेंटिलेटरचा देखील समावेश आहे. कोरोना विषाणू वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या लोकांना पीपीईची कमतरता भासू लागली आहे आणि यामुळे मागणीत बरीच वाढ झाली आहे. दरम्यान, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) स्थानिक उत्पादकांशी मिळून दररोज २०,००० एन 95 मास्क तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बंगळूरुमधील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ३०,००० व्हेंटिलेटरच्या उत्पादनास पाठिंबा दिला आहे. सध्या वैद्यकीय कर्मचार्‍यांना वापरण्यासाठी देशात ३,३४,००० पीपीई किट उपलब्ध आहेत आणि सरकारच्या म्हणण्यानुसार सुमारे ६०,००० पीपीई किट रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तथापि, तुम्हाला पीपीई किट काय आहे माहित आहे का? आणि ती कशी वापरली जाते?


हेही वाचा – भारत लवकरच कोरोनाग्रस्तांवर आयुर्वेदाने उपचार करेल; आयुषमंत्र्यांचा दावा

पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट किट काय आहे?

वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे म्हणजे प्रोटेक्टिव्ह गियर्स, डॉक्टर आणि परिचारिका इत्यादींच्या संरक्षणासाठी तयार केलेले आहेत. जे कोरोनाग्रस्तांवर उपचार करत आहेत त्यांना घालणं अनिवार्य आहे. हे गीअर्स घालून डॉक्टर्स, नर्स यांचं जंतूंच्या संसर्गापासून अधिकाधिक संरक्षण होतं. पीपीई किटमध्ये गॉगल, फेस शील्ड, मास्क, ग्लोव्हज, गाऊन, हेड कव्हर आणि शू कव्हरचा समावेश आहे.

- Advertisement -

पीपीई – वैयक्तिक संरक्षक किट कसे वापरले जाते?

स्टेप १ – आधी गाऊन घाला

- Advertisement -

स्टेप २ – त्यानंतर फेस शील्ड घाला

स्टेप ३ – वैद्यकीय मास्क किंवा संरक्षण मास्कघाला

स्टेप ४ – आता हातमोजे घाला.

स्टेप ५ – शूजला कव्हर करा

पीपीई किट कसे काढावे?

स्टेप १ – स्वतःशी किंवा इतरांशी संपर्क होण्याचा टाळा

स्टेप २ – प्रथम सर्वात अवजड गियर काढा

स्टेप ३ – गाऊन आणि हातमोजे काढा आणि काळजीपूर्वक कचर्‍यामध्ये फेकून द्या

स्टेप ४ – आता आपले हात चांगले धुवा

स्टेप ५ – आता फेस शील्ड काढा आणि कचऱ्यामध्ये फेकून द्या

स्टेप ६ – आता चष्मा उतरवा आणि कचऱ्यात फेकून द्या

स्टेप ७ – शूजवरिल कव्हर काढा

स्टेप ८ – आपले हात चांगले धुवा

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -