घरताज्या घडामोडीगरजूंसाठीच्या अन्न वाटपामध्ये 'ग्रँड मराठा फाऊंडेशनची' साथ!

गरजूंसाठीच्या अन्न वाटपामध्ये ‘ग्रँड मराठा फाऊंडेशनची’ साथ!

Subscribe

राज्य सरकार आणि आपल्या डॉक्टरांनी कोरोनाच्या फैलावाला रोखण्यासाठी चालवलेल्या प्रयत्नांना साह्य करण्यासाठी जीएमएफने मुख्यमंत्री निधीतही देणगी दिली आहे.

कुटुंबियांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बिगरसरकारी संघटनेतर्फे कोरोनाच्या उद्रेकामुळे लागू केलेल्या राष्ट्रीय लॉकडाऊनच्या काळात वंचित घटकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे. जीएमएफतर्फे राज्यातील मुंबई, ठाणे, नागपूर, अंबरनाथ, वाडा आणि पांढरकवडा या भागांमध्ये ही मोहीम चालवण्यात येत असून त्यामार्फत तांदूळ, गव्हाचे पीठ, तेल, तूर डाळ, साखर, मीठ आणि अन्य मसाल्यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.

समाजातील वंचित घटकांचा विकास सुनिश्चित करण्यासाठी त्यांना अधिक उत्तम सुविधा आणि शिक्षण देऊन त्यांची काळजी घेण्यासाठी ग्रँड मराठा फाऊंडेशन कायमच वचनबद्ध आहे. देश करोना विषाणूशी लढा देत असताना आम्ही, ग्रँड मराठा फाऊंडेशनचे सदस्य संकटग्रस्त कुटुंबांपर्यंत पोहोचून त्यांना प्राथमिक जीवनावश्यक वस्तू पुरवत आहोत. या कठीण काळात सर्वांनीच गरजूंना मदत करावी, असे आवाहन आम्ही करत आहोत.”

– रोहित शेलाटकर संस्थापक ग्रँड मराठा फाऊंडेशन

त्या त्या प्रदेशांतील स्थानिक राजकीय पक्षांच्या पाठबळावर ही वाटप मोहीम चालवण्यात येत असून नागरिकांकडूनही तिला जबरदस्त पाठिंबा मिळत आहे. ग्रँड मराठा फाऊंडेशनच्या विश्वस्त माधवी शेलाटकर महाराष्ट्रातील या उपक्रमाचे नेतृत्व करीत आहेत. राज्य सरकार आणि आपल्या डॉक्टरांनी कोरोनाच्या फैलावाला रोखण्यासाठी चालवलेल्या प्रयत्नांना साह्य करण्यासाठी जीएमएफने मुख्यमंत्री निधीतही देणगी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -