घरमुंबईमुक्त विद्यालयातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन स्थगित

मुक्त विद्यालयातील पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन स्थगित

Subscribe

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळानेही पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे मुल्यमापन रद्द

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिक्षण विभागाने पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळानेही पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांचे मुल्यमापन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्याना दिलासा मिळाला आहे. शिक्षण अर्धवट राहिलेल्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करता यावे, यासाठी मुक्त विद्यालय मंडळ सुरु करण्यात आले आहे.

कायद्यातील तरतुदीनुसार होणार मूल्यमापन 

या विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी वयाची अट नाही. कोरोनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यालयाचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे इयत्ता पाचवी आणि आठवीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य मुक्त विद्यालय मंडळाने घेतला आहे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीनुसार होणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे निकाल मे किंवा जूनमध्ये जाहीर होण्याची शक्यता मंडळाने वर्तवली आहे.

- Advertisement -

यंदा पाचवीसाठी ४५ तर आठवीसाठी १७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यापैकी पाचवीच्या परीक्षेसाठी ४२, तर आठवीच्या परीक्षेला ८३ विद्यार्थी बसले होते.


नववी, अकरावीच्या निकालाबाबत शिक्षकांमध्ये संभ्रम
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -