घरCORONA UPDATECoronavirus : अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कुटुंबाला कोरोनाची बाधा

Coronavirus : अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कुटुंबाला कोरोनाची बाधा

Subscribe

अग्निशमन दलाच्या वरिष्ठ पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याच्या पत्नी आणि सुनेलाच कोरोनाची बाधा झाली आहे. परंतु, अधिकारी व त्यांचा मुलगा दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण मुंबईत जंतूनाशक फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्याची भूमिका समर्थपणे पेलणाऱ्या मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याचे कुटुंबालाच कोरोनाबाधित ठरले आहे. अग्निशमन दलाच्या वरिष्ठ पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याच्या पत्नी आणि सुनेलाच कोरोनाची बाधा झाली आहे. परंतु, अधिकारी व त्यांचा मुलगा दोघांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे सध्या हे  अधिकारी भायखळा अग्निशमन दलाच्या वसाहतीत होम क्वारंटाईनमध्ये अडकून पडले आहेत. मात्र, मुंबईत कोरोनाचे मोठे संकट असताना रस्त्यावर उतरुन कार्य करणाऱ्या या लढवय्या अधिकाऱ्याला कोरोनामुळे घरी बसावे लागते, याची रुखरुख त्यांच्या मनाला लागलेली आहे.

भायखळा येथील मुंबई अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बायकोला आणि सुनेला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यानंतर महापालिकेच्या ई विभागाच्यावतीने तात्काळ अग्निशमन दलाच्या वसाहतीत जावून त्यांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्ती व शेजारी आदी १० जणांची तात्काळ वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये दहाही व्यक्तींचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह त्यांच्या शेजारील लोकांना घरीच होम क्वारंटाईनमध्ये ठेवून या इमारतीचे दोन मजले सिल केले आहेत.

- Advertisement -

मुंबई अग्निशमन दलाचे जवान व अधिकारी जंतूनाशक द्रव्यांची फवारणी करताना पीपीई किटचा वापर करून  निर्जंतुकीकरण करत असतात. ज्या अधिकाऱ्याच्या कुटुंबाला कोरोनाची बाधा झाली आहे, ते अधिकारीही निर्जंतुकीकरणाच्या मोहिमेत अग्रस्थानी होते. परंतु त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर त्यांची पत्नी व सून ही २५ मार्चपासून घरीच होत्या. कुठेही बाहेर गेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना झालेली कोरोनाची बाधा यामुळे खुद्द अधिकारीही संभ्रमात पडले आहेत. आपला अहवाला निगेटिव्ह आल्यानंतरही केवळ वैद्यकीय उपचारानुसार १४ दिवस घरी राहणे बंधनकारक असल्यामुळे त्यांना घरी राहावे लागत आहे. परंतु अशा कठिण प्रसंगी घरी बसवणे हे लढवय्या स्वभावाच्या अग्निशमन दलाच्या अधिकारी व जवानांच्या रक्तात नसल्यामुळे आजही दूरध्वनीवरून अग्निशमन दलाच्या जवान आणि अधिकाऱ्यांना मदत करण्याचे कार्य त्यांनी सुरु ठेवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -