पॉर्न व्हिडीओ काढून खंडणीची धमकी

सोशल मीडियाचा वापरकर्त्यांना खंडीणीचे मेल; अकाऊंट हॅक करण्याचीही धमकी

aurangabad teacher shows porn video
सातवीच्या विद्यार्थीनीला अश्लिल व्हिडिओ दाखविल्याबद्दल शिक्षकाला अटक

नाशिक : ई-मेल, इन्स्टाग्राम व फेसबुक वापरणार्‍या व्यक्तींचा वेबकॅमद्वारे अश्लिल व्हिडीओ तयार केला असून, दोन-तीन दिवसांत खंडणी न पाठवल्यास हे अश्लिल व्हिडीओ तुमच्या संपर्कातील व्यक्तींना पाठवले जातील, अशी धमकी देणारे मेल सध्या नागरीकांना येत आहेत. हे मेल फक्त तरुण मुला, मुलींनाच नव्हे तर मोठ्या कंपन्यांच्या डायरेक्टरला सुध्दा आले आहेत. त्यामुळे अकाऊंट हॅक झाल्याची भिती व्यक्त होत आहे. लॉकडाऊनमुळे हजारो कर्मचारी सध्या घरुनच (वर्क फ्रॉम होम) काम करत आहेत. पुरेसा वेळ असल्याने सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. त्यासाठी वेगवेगळ्या स्वरुपाचे इंटरनेट वापरले जात असल्याने त्यांच्या अकाऊंटची सुरक्षा धोक्यात सापडली आहे. सायबर हल्लेखोर आणि घुसखोरांच्या दृष्टीने सोशल मीडिया आणि त्यावरून मिळणारी माहिती खूप उपयुक्त ठरते. इंटरनेटचे काही वापरकर्ते लैंगिक आणि हिंसाचारी उद्देशांनी लहान, तरूण मुलामुलींना आणि वृद्ध व्यक्तीना लक्ष्य करतात. त्यांना ऑनलाइन प्रीडेटर्स म्हणजे ऑनलाईन भक्षक असे नाव आहे. असे भक्षक लहानग्यांचे मतपरिवर्तन करणे, त्यांना लैंगिक गोष्टींमध्ये ओढणे, त्रास देणे, धमकावणे, त्यांच्या अकाउंटवरून वयाला साजेशा नसलेल्या गोष्टी करतात. लोकांना फसवणे किंवा धमकावण्याचे प्रकार सर्रासपणे सुरु आहेत.
&.
एखादी अपरिचित किंवा अल्पपरिचित व्यक्ती आपणास काही कारण नसताना  भेटवस्तू देत असेल, प्रत्यक्ष भेटीचा आग्रह करीत असेल आणि अतिशय प्रेमळपणे वागत असेल तर ही व्यक्ती ऑनलाइन भक्षक असू शकते. त्यांना तुमची किंवा तुमच्या घरातील लोकांची पर्सनल इन्फॉर्मशन देऊ नका.
– अमर ठाकरे, सायबर तज्ज्ञ
&
अशी घ्या काळजी…
-सोशल मीडियासाठी टू वे ऑथेंटिकेशनचा वापर करा. पर्सनल मोबाइलनंबर आणि पब्लिक मोबाइल नंबर वेगळा ठेवा.
-कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.
-टोपणनावाचा वापर करा: यूझरनेम म्हणून स्वतःचे खरे नाव वापरू नका, त्याऐवजी टोपणनावाचा उपयोग करा.
-आपल्या ऑनलाइन प्रोफाइलमध्ये वैयक्तिक माहिती देऊ नका
-प्रोफाइल सेट करताना सर्वांत मजबूत प्रायव्हसी सेटिंग वापरा. यामुळे फक्त तुमचे फ्रेंड्स तुमची माहिती पाहू शकतील.
-ऑनलाइन चॅटिंगचे नियम स्वतःच ठरवा: चॅट वापरण्याचा कालावधी स्वतःच ठरवून तो पाळा.
-अज्ञात (अननोन) इंटरनेट वापरू नका.
&.
आपणांस धमकी दिली गेल्यास…
– घाबरू नका: शांत रहा, चॅट थांबवा व लॉगऑफ करा किंवा चॅटरूमच्या बाहेर पडा
– नाही म्हणण्यास घाबरू नका: भक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी करण्याची आपली तयारी नसेल तर न घाबरता सांगा
– ईमेल आयडीचे फुल हेडर घेऊन ठेवावा आणि ब्लॉक करून ठेवावे.
– आपल्या संवादाचा स्क्रीनशॉट घ्या. तो पुरावा म्हणून पोलिसांना दाखवला जाईल असे भक्षकाला सांगा
-कोणी आपल्याशी असभ्य भाषेत संवाद केल्यास किंवा धमकावल्यास त्या संवादाचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, तो नंतर गरज पडल्यास पुरावा म्हणून वापरता येईल.
– लगेच लॉगऑफ करू नका: कोणी आपल्याशी असभ्य भाषेत संवाद केल्यास किंवा धमकावल्यास लगेचच लॉगऑफ करू नका, पालकांना, सायबर एक्स्पर्ट यांच्याशी चर्चा करा.