घरCORONA UPDATELockDown: भाजपच्या आमरांविरोधात गुन्हा दाखल

LockDown: भाजपच्या आमरांविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

देशात लॉकडाऊन असताना देखील चिथावणीखोर भाषण दिल्यामुळे भाजपाच्या दोन आमदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशात लॉकडाऊन असताना देखील चिथावणीखोर भाषण दिल्यामुळे राजस्थानमधील भाजपाच्या दोन आमदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामगंजमंडीचे भाजप आमदार मदन दिलावर यांच्यावर कोटा येथील महावीर नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अन्य एका प्रकरणामुळे सांगानेरचे भाजपा आमदार अशोक लाहोटी यांच्याविरोधात जयपुरच्या मानसरोवर पोलीस स्थानकामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, चिथावणीखोर भाषण करत लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मदन दिलावर यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

कोरोना आजाराविषयी संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न

विशिष्ट समुदायाविरुद्ध चिथावणीखोर भाषण करुन कोरोना आजाराविषयी संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत मदन दिलावर त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार संजय यादव यांनी केली आहे. दिलावर यांचा ९ एप्रिल रोजीचा चिथावणीखोर वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये मदन यांनी समुदायाविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य दिले असून कोरोन रोगांविषयी गैरसमज पसरवल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथीचे रोग कायद्यान्वये शुक्रवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे अन्वेषण विभागाकडे ही केस सोपविण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक अमृता दुहान यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

तर अशोक लाहोटी यांच्याविरोधात रामचंद्र देवेंद्रा यांनी फिर्याद दिली असून त्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून चिथावणीखोर वक्तव्य आणि भाषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशोक लाहोटी यांच्या भाषणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकतो, असे रामचंद्र देवेंद्रा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.


हेही वाचा – …तर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल; अमेरिकेचा चीनला इशारा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -