घरCORONA UPDATEपश्चिम रेल्वेच्या प्रयत्नांना सलाम! १०५० पीपीई किटची निर्मिती!

पश्चिम रेल्वेच्या प्रयत्नांना सलाम! १०५० पीपीई किटची निर्मिती!

Subscribe

कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्या जिवाची पर्वा न करता डॉक्टर आणि आरोग्यसेवक कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, या लढाईत त्यांच्या सुरक्षेसाठी उपकरणांची आवश्यकता आहे. त्यामुळे ही गरज लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी १ हजार ५० पीपीई सूट तयार केले आहेत. त्यामुळे संपूर्ण भारतीय रेल्वेत लोअर परळ वर्कशॉपच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक होत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णावर उपचार करताना डॉक्टरांना कोरोनाची लागण होऊ नये, म्हणून पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमधील रेल्वे कर्मचाऱ्यांनी नुकतेच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी इन्क्युबेशन बॉक्स तयार केले होते. आता तर चक्क पीपीई सूटच तयार केले आहेत.

western railway ppe kit 1

- Advertisement -

रेल्वेने दिलेल्या महितीनुसार, कोरोनाच्या रुग्णांवर उपचारासाठी मुंबई सेंट्रल स्थित पश्चिम रेल्वेच्या जगजीवनराम रुग्णालयात (जेआरएच) हे किट देण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करणारे हे भारतातील रेल्वेचे एकमेव रुग्णालय आहे. रेल्वेच्या या हॉस्पिटलमध्ये १७२ खाटांची क्षमता आहे. मात्र, जगजीवनराम हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणत पीपीई सूटची आवश्यकता होती. ही बाब लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने लोअर परळ वर्कशॉप आणि उत्पादन विभागांकडे वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी पीपीई सूट तयार करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. वर्कशॉपच्या कर्मचाऱ्यांनी सर्वोत्तम सुरुवात करून डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी बुटासाठी सुरक्षा कव्हरसह १ हजार ५० पीपीई सूट तयार केले आहेत.

western railway ppe kit 2

- Advertisement -

प्रत्येक दिवशी २०० पीपीई सूटची निर्मिती

लोअर परळ कार्यशाळेतील समर्पित पथक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने निश्चित केलेल्या मापदंडानुसार आणि विशेष सिट्राने मंजूर केलेल्या कापडाने कठोर गुणवत्ता नियंत्रणाखाली दररोज २०० ते २२५ सूट तयार करत आहेत.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -