घरताज्या घडामोडीLockdown: रुग्णालय अर्ध्या किलोमीटर अंतरावर असताना मृत्यूनं गाठलं

Lockdown: रुग्णालय अर्ध्या किलोमीटर अंतरावर असताना मृत्यूनं गाठलं

Subscribe

एका ६० वर्षांच्या व्यक्तीचा बुधवारी सायन रुग्णालयापासून अर्ध्या किमी अंतरावर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

मुंबईमधील धारावी येथे एका ६० वर्षांच्या व्यक्तीचा बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व रस्ते, गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हृदयविकाराचा झटका आल्यानंतर अर्ध्या किमीच्या अंतरावर असलेल्या सायन हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता आलं नाही. त्यांच्या मृत्यूनंतर तीन तासांनी एक रुग्णवाहिका आली. धारावी येथे कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत. सायन पूर्व येथील रहिवाशांनी महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार केली होती की धारावीतील बरेच तरुण बाहेर फिरतात. त्यामुळे रस्ता बंद करण्यात आला आहे.

धोबीघाट येथील रहिवासी बबन सुखदेव पवार हे भाजी मार्केटला जात असताना टाटा पॉवर ऑफिसजवळ चक्कर येऊन खाली पडले. लोकांनी त्यांच्यावर पाणी मारुन शुद्धीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या छातीवर हात लावून पाहिला असता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा संशय आला. लोक त्यांना हॉस्पिटलमध्ये घएऊन जायला तयार होती मात्र, पालिकेने रस्ते बंद केल्यामुळे घएऊन जाता आलं नाही, असं सामाजिक कार्यकर्ते जुबैर कुरेशी यांनी सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – दिलासादायक! राज्यात हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर


सिद्धार्थ मेढे, एक रहिवासी म्हणाले, जर तो रस्ता उघडा असता तर त्यांनी त्याला दहा मिनिटांत हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता आलं असतं आणि पवार यांना वैद्यकीय मदत मिळाली असती. “कोविड -१९ मुळे अगदी रुग्णवाहिका शोधणं हे मोठ टास्क आहे. आम्हाला बघ्याची भूमीका घ्यावी लागली बाकी काही करता आलं नाही,’’ असं मेढे म्हणाले. पवार यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. आठ महिन्यांपूर्वी लोणावळा येथे झालेल्या अपघातात त्यांचा मुलाचा मृत्यू झाला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -