घरCORONA UPDATECorona Live Update: महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची मुख्यमंत्री सहाय्यता नीधीला ५ लाखाची...

Corona Live Update: महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची मुख्यमंत्री सहाय्यता नीधीला ५ लाखाची मदत

Subscribe

महाराष्ट्रासह संपुर्ण देशावर आलेल्या कोरोना महामारीच्या संकटातून सावरण्यासाठी आणि या अदृष्य विषाणु विरूद्ध लढाई जिंकण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदतीचे आवाहन केले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत ‘महाराष्ट्र एसटी कामगार सेने राज्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये ५ लाख रूपयांचे योगदान दिले आहे


मुंबई विशेष न्यायालयाने आज डीएचएफएलचे प्रमोटर कपिल वाधवान आणि RKW डेव्हलपर्सचे प्रमोटर धीरज वाधवान यांना २९ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

भारतात कोरोनाच्या संकटाच्या सद्यस्थितीबद्दल भाष्य करण्यासाठी आरोग्य मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, मागच्या १४ दिवसांमध्ये देशातील ८५ जिल्ह्यांमध्ये एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही.

- Advertisement -

 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेला सुरुवात झाली आहे.


मुंबईतल्या कंटेनमेंट झोनमध्ये घट झाल्याची माहिती समोर आली आहे. आत्तापर्यंत मुंबईत १०३६ कंटेनमेंट झोन होते. मात्र, त्यात आता २३१ने घट झाली आहे. ही संख्या आता ८०५वर आली आहे. कमी झालेल्या २३१ कंटेनमेंट झोनमध्ये गेल्या १४ दिवसांमध्ये एकही नवा कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. मात्र, कंटेनमेंट झोन कमी झाले असले, तरी या २३१ झोनमध्ये लॉकडाऊनचे नियम मात्र कायम असणार आहेत.


कोरोनाच्या केसेसमध्ये घट होत नसताना देशापुढचं संकट अधिकाधिक गहिरं होत चाललं आहे. या पार्श्वभूमीवर देशात ३ मेपर्यंत जाहीर केलेला लॉकडाऊन वाढवायचा की अटी घालून काही भागांमध्ये नियम शिथिल करायचे? याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत. या बैठकीमध्ये लॉकडाऊन वाढवण्याविषयी, तसेच राज्या-राज्यांमधल्या परिस्थितीविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे.


महाराष्ट्रात आज राज्य मंत्रिमंडळाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक होणार आहे. या बैठकीत सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदारकीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. कारण राज्यपाल नियुक्त २ जागांपैकी एका जागेवर उद्धव ठाकरेंना पाठवण्याचा प्रस्ताव होता. मात्र, राज्यपालांनी अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. त्याशिवाय, विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासंदर्भात काय निर्णय घेता येईल? यावर देखील मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.


ऑनलाईन फ्रॉडसाठी कुप्रसिद्ध असलेल्या झारखंडमधल्या जमताडामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आहे. त्यामुळे झारखंडमधल्या कोरोनाग्रस्तांची संख्या ८३वर गेली आहे.


अमेरिकेत गेल्या २४ तासांत १ हजार ३३० कोरोना रुग्णांचा मृत्यू!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -